आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Imphal Airport Flights Delayed Women Passenger Shouts At Union Minister Kj Alpho

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्लाईटला उशीर झाल्यावर इंफाळ विमानतळावर प्रवासी महिलेने थेट केंद्रीय मंत्र्यांनाच जाब विचारला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानतळावर मंत्री अल्फोन्स यांना सुनावताना महिला. - Divya Marathi
विमानतळावर मंत्री अल्फोन्स यांना सुनावताना महिला.

इंफाळ- मणिपूर येथे इंफाळ एअरपोर्टवर VVIP येत असल्याने उड्डाणाला विलंब झाला, एका प्रवासी महिलेने याचा जाब थेट तेथे उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांना विचारला. या महिलेने सांगितले की मी डॉक्टर असून मला वेळेवर कामाला जायचे होते. तर अल्फोन्स हे आपण समजू शकतो असे या महिलेला म्हणत होते. महिला त्यांना म्हणाली की तुम्ही लिहून द्या की फ्लाईट डिले होणार नाही. 

 

 

महिला डॉक्टरला एका रुग्णावर उपचार करण्यासाठी तातडीने जायचे होते. मात्र अल्फोन्स यांच्यामुळे विमानाला उशीर झाला. संताप अनावर झालेल्या महिला डॉक्टरने अल्फोन्स यांना चांगलेच सुनावले. मोदींचं मंत्रिमंडळ व्हीआयपी संस्कृतीच्या विरोधात असतानाही अशा घटना का, असा सवालही अल्फोन्स यांना करण्यात आला. अल्फोन्स यांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ऐकून घेतले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...