आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Impose Emergency And Sterilise Muslims Christians Forcibly Says Hindu Mahasabha Leader

मुसलमान, ख्रिश्चनांची नसबंदी करा, हिंदू महासभेच्या उपाध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंद- ऑल इंडिया हिंदू महासभेच्या उपाध्यक्षा साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशातील मुसलमान आणि ख्रिश्चनांची जबरदस्तीने नसबंदी करायला हवी. तरच त्यांची लोकसंख्या नियंत्रणात राहिल. साध्वी देवा ठाकूर यांनी हरियाणातील जिंद येथील एका कार्यक्रमात वरील वक्तव्य केले.

'देशात मुसलमान आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला लगाम लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात आणीबाणी जाहीर करावी. एकाच वेळी मुसलमान आणि ख्रिश्चन पुरुषांची सक्तीने नसबंदी करावी. नसबंदी केल्याने ते मुले जन्माला घालू शकणार नाही. तसेच मशिद आणि चर्चमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात, असेही
हरियाणातील जिंदमध्ये साध्वी देवा ठाकूर म्हटले.

हिंदुंनी जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घालून जगात आपली ओळख कायम ठेवावी.राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथुराम गोडसेला 'शहीद' संबोधले. हरियाणात गोडसेंचा पुतळा उभारावा असेही साध्वी देवी ठाकूर यांनी म्हटले आहे.