आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, पासवानांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे राज्यातील गुन्ह्यांच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात यावा. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे.

राजकीय वैमनस्यातून बिहारमध्ये अनेक हत्या झाल्या आहेत. त्यावर कायद्याने अंकुश लावण्यात विद्यमान सरकारला अपयश आले आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून ‘जंगलराज-२’ सुरू झाले आहे. माझ्या पातळीवर हे थांबवण्याचे माझे प्रयत्न आहे. म्हणूनच मी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यांना बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल अवगत करून दिले. राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्यांच्या प्रकरणांचा सीबीआयमार्फत तपास व्हावा. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी करणारे पत्रही पंतप्रधानांना सोपवण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वेश्वर आेझा यांची अलीकडेच हत्या झाली होती.

निकाल ही जनतेची भावना
मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी विधानसभा पोटनिवडणुकीत आरएलएसपी उमेदवार सुधांशू शेखर यांचा विजय झाला आहे. अर्थात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला नागरिकांनी नाकारले आहे. त्यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवर जनतेने प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा निकाल भावना दर्शवणारा आहे.