आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan And Supporters Protest Against Nawaz Sharif

सरकारबरोबर चर्चा करण्यास इम्रान खान यांनी दाखवली तयारी, ठेवल्या 6 अटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : पाकिस्‍तानमधील संसदेच्या प्रवेशद्वारावर पाकिस्तान आवामी तहरीक (पीएटी) पार्टीचे नेते आणि धर्मगुरू ताहीर उल कादरी यांचे समर्थक.

इस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी डॉन या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा पक्ष सरकारशी चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या सदस्यांनी सरकारबरोबर चर्चेंनंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पीटीआयने सरकारसमोर सहा मागण्या ठेवल्या आहेत. सर्वात आधी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे भाऊ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहनवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक सुधारणा, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला बरखास्त करून पुनर्गठन करावे, ठरावीक मतदारसंघांमध्ये फेरमतमोजणी, निवडणुकीत गैरप्रकार करणा-यांच्या विरोधत कडक कारवाई आणि पुन्हा निवडणुका घेण्याची अखेरची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि पंजाबचे मुख्यमंत्री शहनवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याशी ताज्या घडामोडींबाबत चर्चा केली आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने इम्रान खान आणि ताहीर उल कादरी यांनी गुरुवारी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी, पीटीआय पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलक पंतप्रधानांच्या निवासात घुसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मंत्री रफीक यांनी ट्वीट केले की, इम्रान खान यांनी अपशब्दांचा वापर केल्यानंतरही पंतप्रधान शरीफ त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत. पण यासंदर्भात वृत्त येतात त्यांनी युटर्न घेत आपल्याकडे ट्वीटर अकाऊंटच नसल्याचे सांगितले. शरीफ यांनी अद्याप यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही.


चौकशीसाठी कोर्टाने उचलली पावले
इम्रान यांनी शरीफ आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) वर गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप लावत राजीनाम्याची मागणी केली आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने चीफ जस्टीस नसीर-उल-मुल्क यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठाची स्थापना केली आहे. स्वतः नवाज शरीफ यांनीही चौकशीची घोषणा केली होती. अनेक लोक हा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...