आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूल नेत्याच्या घरी बॉम्ब बनवत होते इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी, करणार होते स्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्‍मक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोट प्रकरणी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. तृणमूल कांग्रेसच्या नेत्याच्या ऑफिसमध्ये झालेला स्फोट एलपीजी सिलेंडर फुटल्याने नव्हे तर बॉम्बमुळे झाला होता. एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार घरात इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी बॉम्ब तयार करण्याचे काम करत होते. IED तयार करताना झालेल्या स्फोटात 2 जण ठार तर एक जखमी झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीन अत्यंत संवेदनशील या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयाच्या घे-यात आहे.
पोलिसांच्या तपासाआधीच नष्ट केले विस्फोटकांचे साहित्य
स्थानिकांच्या मते गुरुवारी जेव्हा फायर ब्रिगेड आणि पोलिस घटना स्थळी पोहोचले तेव्हा रिव्हॉल्वर घेतलेल्या दोन महिलांना पोलिसांना बराच वेळ घरात घुसूही दिले नाही. तसेच त्यांनी बिल्डींग उडवून देण्याची धमकीही दिली.
अनेक तास पोलिस बाहेर होते त्या दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आल्याचे लोकांनी सांगितले. पोलिसंना नंतर काही अर्धवट जळालेले कागद मिळाले. त्यात अल कायदा प्रमुख अल जवाहिरी आणि इंडियन मुजाहिदीनचे काही लीफलेट्सही होते.
दहशतवादी स्फोट घडवण्याची शक्यता
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळाहून 55 IED डिव्हइस, आरडीएक्स, घड्याळींचे जायल अनेक नकाशे आणि सिम कार्ड आढळले आहेत. केंद्रीत तपास संस्थेचे अधिकारी पोहोचण्याआधीच पोलिस रेतीने भरलेल्या ट्रकमध्ये विस्फोटके घेऊन गेले आणि ते नष्टही केले. सुत्रांच्या मते प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी असे केले असावे. IED पूर्णपणे तयार होते आणि दहशतवादी काही दिवसांत स्फोट घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहितीही मिळाली आहे.
गुप्तचर संस्थांना पोलिसांवर शंका
गुप्तचर संस्थांतील अधिका-यांनी सांगितले की, वर्धमानचे एसपी आणि स्थानिक ठाण्यातील पोलिसही मदत करत नाहीत. बॉम्ब तपासासाठी ठेवायला हवे होते पण त्यांनी बॉम्ब नष्ट केले. त्यानंतर पुरावे नसल्यामुळे केसही करता आली नाही, असेही अधिकारी म्हणाले. तर मारल्या गेलेल्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती आणि बॉम्ब क्रूड सॉकिटचे होते असे एसपींनी सांगितले. तर सीआयडी अधिका-याने त्याच्या उलट माहिती दिली. 55 IED नष्ट केल्याचे त्याने सांगितले.
भाजप आणि माकपची टीका
भाजप आणि माकप यांनी या संघटनेला 'तृणमूलची दहशतवादी संघटना' असे नाव दिले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. या स्फोटात शकील अहमद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर शोभम मंडल याचा रुग्णालयात मृत्यू झाला.