आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In A First, Andhra Pradesh Holds A Paperless Cabinet Meet

E CABINET MEET : आंध्र प्रदेशची ऐतिहासिक बैठक, कागदाचा वापरच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : आंध्र प्रदेश सरकारची पहिली ई-कैबिनेट मिटींग.

हैदराबाद - आंध्रप्रदेश सरकारने पहिली वहिली ई कॅबिनेट मिटींग घेत ऐतिहासिक सुरुवात केली आहे. ई कॅबिनेट मिटींग म्हणजेच या मिटींगमध्ये कागदाचा वापरच करण्यात आला नाही. देशात एखाद्या राज्याच्या सरकारने कागदाचा वापर न करता बैठक घेण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

आपल्या टेक्नोसॅव्ही प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. बंद खोलीत झालेल्या या बैठकीचे फोटो आणि फुटेज सरकारचे नियंत्रण असलेल्या टिव्ही चॅनल्सद्वारे समोर आले. आंध्रप्रदेशच्या मंत्र्यांनी ईकॅबिनेट नावाच्या अ‍ॅपच्या मदतीने बैठकीचा पूर्ण अजेंडा जाणून घेतला. हे अ‍ॅप डेस्कटॉप, लॅपटॉप आणि आयपॅडवर डाउनलोड करून मंत्री डेटा अ‍ॅक्सेस करत आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने मिळवला जाणारा डेटा आणि पासवर्ड सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिहारची अनोखी मंत्रिमंडळ बैठक