आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत आगळा वेगळा फॅशन शो, पोस्टमन पहिल्यांदाच उतरले रँपवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्री घेऊन रँपवॉक करताना पोस्टवुमन. - Divya Marathi
छत्री घेऊन रँपवॉक करताना पोस्टवुमन.
चेन्नई - चेन्नईत गेल्या आठवड्यात टपाल विभागाचा नवा चेहरा पाहायला मिळाला. येथे एक वेगळा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. त्यात पोस्टमन आणि पोस्टवुमन सहभागी झाल्या. टपाल विभागाच्या १९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्या भारतीय टपाल विभागाने असे आयोजन केले.

दिवसभर घरोघरी जाऊन टपाल देणाऱ्या पोस्टमनला नव्या वेशात असे रँपवर चालताना पाहणे हा वेगळाच अनुभव होता. १५ पोस्टमन आणि १५ पोस्टवुमन यांनी रँपवर सहभाग नोंदवला. व्यावसायिक मॉडेलच्या तुलनेत ते कोठेही कमी पडले नाहीत. सहजपणे रँपवर फिरले, थांबले आणि परतले. पोस्टवुमनही संपूर्ण तयारीनिशी आल्या होत्या. खाकी सलवार-
कुर्त्यासोबत त्यांनी शर्टही घातला होता. काही तर बॅग आणि छत्री घेऊन
रँपवर उतरल्या. एम. मुरूगनधम हे पोस्टमन या फॅशन शोचे विजेते ठरले. ते खाकी टोपी घालून रँपवर आले होते. त्यांना दहा हजारांचे बक्षीस मिळाले. चेन्नईचे पोस्टमास्टर जनरल मेर्विन अलेक्झांडर यांनी हा शो आयोजित केला होता. त्यांनी सांगितले की, पोस्टमन आणि पोस्टवुमन यांनी आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडावे, त्यांना कामाबद्दल प्रेम वाटावे, त्यांनी जगासोबत राहावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते. हा विचार अमलात आणण्यासाठीच शो आयोजित केला होता. दोन शतकांपासून पोस्टमन आणि ग्राहक यांचे नाते आहे. ते पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे. या शोसाठी संपूर्ण चेन्नई विभागातून २५० जणांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. अंतिम फेरीसाठी १५-१५ पोस्टमन आणि वुमन यांची निवड झाली. महिला स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या सहकारीही पारंपरिक कांचीपुरम साड्या परिधान करून आल्या होत्या. या शोमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कामातही दिसेल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...