जम्मू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मंगळावारपासून जम्मूमध्ये महत्त्वाची परिषद आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1925 मध्ये स्थापन झालेला संघ जम्मू-काश्मिरात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पातळीवर बैठकीचे आयोजन करत आहे. बैठकीत सहभागासाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर नेते शनिवारीच जम्मूत डेरेदाखल झाले आहेत. बैठकीत खासकरून काश्मीरशी निगडित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
195 प्रचारक होणार सहभागी
- तीन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय बैठकीत दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना संघाकडून मेसेज देण्याचा प्रयत्न आहे.
- यात देशभरातून 195 प्रचारक सहभागी होणार आहेत. याशिवाय संघाशी संबंधित इतर संघटनांचे सदस्यही यात सामील होतील.
- काश्मीर खोऱ्यात वाढलेला दहशतवाद, दगडफेक, सुरक्षा दलांवरील हल्ले आणि राज्यात पीडीपी-भाजप सरकार अशा विषयांवर विचार केला जाणार आहे.
- सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी, दत्तत्रेय होसबोले आणि कृष्ण गोपाल शनिवारीच जम्मूत पोहोचले.
- भागवत यांनी 15 ते 17 जुलैपर्यंत येथे अनेक ग्रुप्सची मीटिंग घेतली.