आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदप्रकरणी सोमवारी बोलू - राजनाथसिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नेमका कोठे दडून बसला आहे, याची माहिती नसल्याच्या गृह राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शमवण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंह सोमवारी केंद्राची भूमिका स्पष्ट करणार आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी आपण त्यावर बोलू, असे त्यांनी येथे सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संसदेत सोमवारी किंवा मंगळवारी आपण त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहोत. हा मुद्दा चर्चेत आला नव्हता. योग्य माहिती मिळाल्यानंतरच दाऊद इब्राहिमच्या प्रत्यार्पणाबद्दल काही सांगता येऊ शकेल, असे सिंह यांनी म्हटले आहे. ५ मे रोजी लोकसभेत गृह राज्यमंत्री हरिभाई परातीभाई चौधरी यांनी लेखी उत्तरात दाऊदबद्दल काहीही माहिती नसल्याचे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...