आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुत कर्फ्यु, तामिळ तरुणाच्या सोशल मीडिया पोस्टने भडका, 1 ठार 103 वाहने पेटवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू पुन्हा पेटले आहेत. तामिळ युवकाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुरू झालेला संघर्ष हिंसक झाला आहे. कर्नाटकमध्ये तामिळ क्रमांकाची आणि तामिळनाडूत कर्नाटक क्रमांकाची १०५ हून अधिक वाहने जाळली जात आहेत. ५०-५५ दुकानेही लुटण्यात आली आहेत. बंगळुरुतील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान गोळीबारात एक जण ठार झाला आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या घरावर लोकांनी दगडफेक केली. २०० जणांना अटक झाली आहे.
बेंगळुरूसह अनेक शहरांतील शाळा- महाविद्यालये बंद आहेत. सुपरस्टार रजनिकांतच्या घराचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कर्नाटकमधील तमिळी नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करणारे पत्र तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे. बंगळुरुमधील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या या शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन बंगळुरु पोलिसांनी केले आहे. एखादी बातमी कानावर पटली तर 100 नंबरवर फोन करुन सत्यता पटवून घ्या. तसेच ट्विटर अकाऊंट @BlrCityPolice किंवा 9480801000 या क्रमांंकावर व्हॉट्सअॅप करा असे सांगण्यात आले आहे.
- बंगळुरूमध्‍ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.
- 15,000 पोलिस, निमलष्करी दलाचे जवान, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान बंदोबस्ताला.
- 16 पोलिस ठाण्याच्या परिसरात कर्फ्यु लावण्यात आला आहे.
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे.
- बंगळुरूतील हिंसक आंदोलनाचे पडसाद तामिळनाडूमध्‍येही उमटू लागलेत.
- पोलिसांनी याप्रकरणी 4 लोकांना ताब्यात घेतले आहे.
- आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी उच्चाधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
- चैन्नईतील कानडी शाळांना अर्ध्या दिवसाची सुटी देण्यात आली आहे.
- कर्नाटकात तामिळनाडूच्‍या लोकांना पूर्णपणे संरक्षण देऊ असे आश्‍वासन कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले.
काय आहे पाण्‍याचा वाद..
कर्नाटकमधून तामिळनाडूसाठी 20 सप्टेंबरपर्यंत कावेरी नदीचे 12 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने यापूर्वी आदेशात कर्नाटकला 15 हजार क्यूसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे पाणी सोडण्‍याला कर्नाटकात विरोध केला जात आहे. या पाणी वाटपाविरोधात बंगळुरूशिवाय मंड्या, म्हैसुर व हासनमध्ये उग्र निदर्शने सुरू आहेत. बंगळुरू, म्हैसुरात आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे भडकले आंदोलन...
बातम्या आणखी आहेत...