आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत गोएअरचे विमान एअरोब्रिजला धडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - स्वस्तात विमानसेवा देणाऱ्या गोएअरचे मुंबईहून आलेले एअरबस ३२० विमान चेन्नई विमानतळावर उतरत असताना एअरोब्रिजला धडकले. विमानात १६८ प्रवासी होते. ते सर्व जण सुरक्षित आहेत. मात्र या अपघातात विमानाचे नुकसान झाले.

डॉकिंगची प्रक्रिया सुरू असताना ऑपरेटर फोनवर बोलण्यात मग्न होता. त्यामुळे त्याचे जेटवेवरील नियंत्रण सुटले, असे डीजीसीएने म्हटले आहे. या अपघातात विमानाचे बाजूच्या दारांचे थोडे नुकसान झाले. नुकसानीचा नेमका अंदाज आल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.