आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Chennai’s Hospitals, These Clowns Are Making Kids Smile, Forget Their Pain

रुग्णांच्या वेदनांवर जोकर होऊन फुंकर; डॉ.रोहणींचे पथक मुलांना हसवते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- रोहणी राऊ (२९) चेन्नईतील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. लहान मुलांचे त्यांना खूप वेड. म्हणून रुग्णालयात दाखल अशा मुलांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांनी अनोखी मोहीम सुरू केली आहे. रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्या रिकाम्या वेळेत वॉर्डांत जातात. लहान मुलांच्या आवडी-निवडी विचारतात. गाणी, विनोदांतून त्यांना हसवतात. एखादे बालक काहीच बोलत नसेल तर त्या स्वत:च जोकर होतात. मग मुलांचे चेहरे आनंदाने फुलतात. यासाठी रोहणी यांनी स्थानिक कलाकारांचे एक पथक तयार केले आहे. हे कलाकार रोहणींसोबत रुग्णालयात जाऊन मुलांना हसवतात.

चेन्नईतील कावेरी रुग्णालयात पाच वर्षीय आझाद पेडियाट्रिक वॉर्डात भरती आहे. एक आठवड्यापासून त्याच्या फुफ्फुसावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे तो शाळेतही जाऊ शकत नाही. अगदी उदास, शांत झोपून राहतो. रोहणीचे पथक चक्क जोकर बनून जेव्हा त्याच्या वॉर्डात गेले तेव्हा तो अगदी खळखळून हसू लागला. आझादची आई नूरजहां म्हणते, ‘या लोकांकडे पाहून माझा आझाद हसतो आहे यात मला खूप आनंद आहे. नाही तर तो फारच उदास होता...’

रुग्णालयात जोकर होऊन मुलांना हसवण्याची कल्पना रोहणीच्या आईने दिली होती. राेहणी म्हणते, ‘ही अफलातून कल्पना आहे. मला आठवते, शाळेत मी अिभनय करत असे. मात्र, आता जॉब करून मुलांना हसवण्यात वेगळाच आनंद मिळतो. देशभरातील रुग्णालयांत असे काहीतरी करायला हवे. आमच्या पथकात फक्त मी डॉक्टर आहे. उर्वरित सदस्यांत एक कोरिओग्राफर, एक ऑपेरा सिंगर आिण इतर काही कलाकार आहेत. आम्ही मिळून मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो.’