आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-PAK सीमेवर US-मेक्सिको बॉर्डर प्रमाणेच लावण्यात येणार ड्रॅगन फेंसिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमध्ये पाकिस्तानला लागुन असलेली सीमा 1996 मध्ये सील करण्यात आली होती. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
राजस्थानमध्ये पाकिस्तानला लागुन असलेली सीमा 1996 मध्ये सील करण्यात आली होती. (संग्रहित फोटो)
जोधपूर- थारच्या वाळवंटात भारत-पाकिस्तान बॉर्डरवर 32 किलोमीटर अंतरासाठी US-मेक्सिको बॉर्डर प्रमाणे ड्रॅगन फेंसिंग लावण्यात येणार आहे. थारच्या वाळवंटात जैसलमेर जिल्ह्यातील शाहगड बल्ज क्षेत्रात रेतीच्या टेकड्या वादळ आल्यावर एकाच रात्रीत गायब होतात. त्यामुळे तेथील फेंसिंग देखील तुटते. त्यामुळे घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान बीएसएफ समोर असते. 

संसदीय समितीने दिला होता सल्ला

- वाळवंटात फेंसिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट्स व्यक्तींनी या भागाचा दौरा केला होता. त्यांना यावर कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आला नव्हता. 
- बॉर्डर सुरक्षेशी संबधित संसदीय समितीने मागील वर्षी या भागाचा दौरा केला होता. समितीचे म्हणणे आहे की शाहगड बल्ज भागातील 32.5 किलोमीटर बॉर्डरवर सध्या असलेली फेंसिग ही तकलादु आहे.
- पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील समितीने नुकताच राज्यसभेत एक अहवाल सादर केला होता. या अहवालात या भागात ड्रॅगन फेंसिंगची शिफारस करण्यात आली होती. 
- अशाच पध्दतीची फेंसिंग अमेरिका-मेक्सिकोच्या बॉर्डरवरील वाळवंटी भागात लावण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...