आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-पीडीपीचे फुटीरतावादी राजकारण, सईद यांची धोरणे घातक : अब्दुल्लांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सत्ताधारी भाजप-पीडीपी सरकारवर टीका केली असून सरकार फुटीरतावादी राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे धोरण कल्याणकारी नसून जनतेत फुटीरता पेरत असल्याचा आरोप अब्दुल्लांनी केला.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मुख्यालयात माध्यमांशी बोलताना फारूक यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. सोमवारी क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे क्रीडा मंत्री इम्रान अन्सारी निवडून आले. ३५ वर्षांपासूनचे अब्दुल्लांचे वर्चस्व संपुष्टात आले. मात्र, तूर्तास अन्सारी यांच्या निवडीवर जम्मू न्यायालयाने स्थगिती आणली आहे.

क्रिकेट असोसिएशनमध्ये हस्तक्षेप करू नये
मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी क्रिकेट महामंडळात ढवळाढवळ करू नये, असा सल्ला अब्दुल्लांनी दिला. पूरग्रस्त काश्मीरचा मुद्दा महत्त्वाचा असताना सईद यांनी असल्या बाबींत लक्ष घालण्याची गरज नाही. काश्मिरी तरुणांना योग्य दिशादर्शनाचे कार्य सत्ताधाऱ्यांनी करावे.

सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव
राज्याच्या क्रिकेट महामंडळात हस्तक्षेप म्हणजे सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी व घुसखोरी असल्याची टीका फारूक यांनी केली. जम्मू-काश्मिरात सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे पोलिस गुन्हा नोंदवून घेण्यास धजावत नसल्याचे ते म्हणाले. देशाने जम्मू-काश्मीरची वास्तविकता लक्षात घेण्याचे आवाहनही फारूक अब्दुल्ला यांनी केले.

तीन वर्षांसाठी झाली होती निवड
जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मे २०१४ झाली होती. यात फारूक अब्दुल्लांची ३ वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा इम्रान अन्सारींचा निर्णयच बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे.

असोसिएशनच्या ६४ सदस्यांपैकी ४२ जणांनी अन्सारींची बिनविरोध निवड कशी जाहीर केली, हा सध्या पेच आहे. या निवडणुकीला अब्दुल्लांनी आव्हान दिले. अब्दुल्लांचा कार्यकाळ शिल्लक असताना मुदतपूर्व निवडणूक घेतल्याने न्यायालयाने इम्रान अन्सारींच्या निवडीवर स्थगिती दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...