Home »National »Other State» In Photos: Rare Mythical Bird Black Garuda Eagle Spotted At Chatra, Jharkhand

पाण्याच्या शोधात आलेल्या दुर्मिळ पक्ष्याचा लोकांच्या अतिउत्साहाने झाला मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:16 PM IST

  • दुर्लभ पक्षी चतरामध्ये लोकांच्या हाती लागल्यामुळे पक्षीचे हाल झाले.
चतरा(झारखंड) - येथे आढळून आलेल्या एका गरुडाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. वन विभागाने यावर योग्य उपचार न केल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी काही मुले या गरुडासोबत खेळताना दिसले. या दरम्यान हा गरुड पक्षी जखमी झाला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याला उपचारासाठी नेले होते.
पाण्याच्या शोधात पोहचला होता तलावाजवळ....
- मिळालेल्या माहितीनुसार हा गरुड पाण्याचा शोधात शहरातील तलावाजवळ उतरला होता. परंतु पाणी पिताना मुलांनी त्याला पकडले.
- रांची विद्यापीठ झूलॉजी विषयाचे प्रोफेसर डॉ. रज्जूदिन यांनी सांगितले. की गरुड हा दुर्लभ पक्षी आहे. संपूर्ण जगभरामध्ये यांची संख्या 5 हजारपेक्षाही कमी आहे.

झारखंड मध्ये वाढत आहे गरुडाची संख्या..
- प्रोफेसर रज्जुदिन सांगतात की मागील दोन वर्षांपूर्वी झारखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक गरुड आढळून आले आहेत.
- येथील वातावरण गरुडांसाठी अनुकूल आहे. 2014 मध्ये बोकरोच्या पेटवार येथेसुद्धा गरुड पक्षी आढळून आले होते. हे पक्षी मुख्यतः ज्या ठिकाणी उंच झाडे आणि पाण्याचा स्त्रोत चांगला आहे अशा ठिकाणी आढळून येतात.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या दुर्लभ पक्षाचे इतर काही फोटो...

Next Article

Recommended