आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Police Firing Electricity Wire Break, 11 Died

पोलिसांच्या गोळीबारात वीज तार तुटली, ११ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसामच्या तिनसुकीया जिल्ह्यातील पेंगेरी पोलिस ठाण्यासमोर पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सोमवारी अत्युच्च दाबाची वीजतार कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. तर, ४ पोलिस कर्मचाऱ्यांसह २० जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना आपल्या हवाली करण्यात यावे, या मागणीसाठी काही लोकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. दरम्यान, आंदोलकांचा हा जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार सुरू केला. दरम्यान, एक गोळी पोलिस ठाण्यासमोरून जात असलेल्या अत्युच्च दाबाच्या वीजतारेला लागली. त्यामुळे वीज तार आंदोलकांवर पडली. तारेत अत्युच्च दाबाचा वीजप्रवाह असल्यामुळे आंदोलनातील ११ जणांचा मृत्यू झाला.

पांगेरे भागात मागच्या तीन दिवसांपूर्वी एक व्यक्ती, त्याचा मुलगा व सूनेचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यांच्यापैकी मुलाने अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून स्वत:ची सुटका करून घेतली होती. दरम्यान, इतर दोघांचे मृतदेह सापडले होते. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली होती. या आरोपींना शिक्षा देण्यासाठी आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलक करत होते.