आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणी पद्मावतीसोबत 750 किन्‍नरांनीही केला होता जौहर, सिनेमाला किन्‍नर समाजाचा विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्‍थान किन्‍नर समाजाची गादीपती कांता बुआ. - Divya Marathi
राजस्‍थान किन्‍नर समाजाची गादीपती कांता बुआ.

जोधपूर- निर्माता-दिग्‍दर्शक संजय लीला भन्‍साळी यांच्‍या पद्मावती सिनेमाला असलेला विरोध काही कमी होण्‍याची चिन्‍हे दिसत नाही. राजपूत समाजाने या चित्रपटाच्‍या प्रदर्शनाला विरोध केला आहे. आता या वादात तृतीयपंथीयांनीही उडी मारली असून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. किन्‍नर समाजाने दावा केला आहे की, चित्‍तौडगड किल्‍ल्‍यात महाराणी पद्मावतीसोबत साडे सातशे तृतीयपंथीयांनीही जौहर केला होता.


या कारणामुळे तृतीयपंथीयांचा विरोध
- किन्‍नर समाजाचे गादीपती कांता बुआ यांनी संजय लीला भन्‍साळीवर आरोप केला आहे की, 'या सिनेमाद्वारे आमच्‍या सांस्‍कृतिक पंरपरांना चुकीच्‍या पद्धतीने दाखवले जाणार आहे. हा पूर्णपणे भारताचा अपमान आहे. त्‍यामुळे किन्‍नर समाज या सिनेमाला प्रदर्शित होऊ देणार नाही.' या सिनेमाला विरोध करण्‍यासाठी सर्वांनी एकजूट केली पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केली आहे.
- कांता बुआ म्‍हणाले की, आमच्‍या पंरपरेनुसार घुमर नृत्‍य कधीही सिनेमात दाखवलाप्रमाणे इतक्‍या उघडपणे होत नाही. सिनेमा निर्मितीला आमचा विरोध नाही. मात्र सांस्‍कृतिक परंपरांना चुकीच्‍या पद्धतीने सिनेमात दाखवले जाऊ नये.
- ज्‍या नेत्‍यांचे आणि लोकांचे या सिनेमाला समर्थन आहे त्‍यांच्‍याबद्दल कांता बुआ म्‍हणाल्‍या की, 'अशा लोकांनी आमच्‍या जवळ येऊ आम्‍ही त्‍यांना पूर्ण मर्द बनवू.'


साडेसातशे किन्‍नरांनी घेतली होती जौहरमध्‍ये उडी
- कांता बुआ म्‍हणाल्‍या, महाराणी ' पद्मावती यांना किन्‍नर समाज देवीप्रमाणे मानत आला आहे. राणी पद्मावतीच्‍या सेवेसाठी त्‍यावेळी किल्‍ल्‍यामध्‍ये साडेसातशे तृतीयपंथीय तैनात होते. या सर्व तृतीयपंथीयांनी राणी पद्मावती व इतर महिलांसोबत जौहरच्‍या आगीत उडी घेऊन आपल्‍या प्राणाची आहुती दिली होती. अशात  सर्व किन्‍नर समाजाचे हे दायित्‍व आहे की, त्‍यांनी या सिनेमाला विरोध करावा.'  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...