आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Saharsa Wife Gave Her Husband's Life By Jumping Into The Burning Pyre

बिहार : पतीच्या चितेत उडी घेत पत्नीने त्यागला प्राण, गावक-यांनीही वाचवले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः प्रतिकात्मक)

पटणा - बिहारमध्ये पतीच्या जळत्या चितेत उडी घेऊन पत्नीने जीव दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सहरसा जिल्ह्याच्या परमिनिया गावाची आहे.
गावातील रामचरित मंडल (75) चा आजारणामुळे मृत्यू झाला होता. गावकरी जेव्हा त्याचा अंत्यविधी करून परतत होते, त्यावेळी रामचरितची पत्नी गहवा देवी घरी नव्हती. त्यामुळे गावकरी पुन्हा स्मशानात गेले. पण ते सर्व लोक स्मशानापर्यंत पोहोचण्याआधी गहवादेवीचा जळाल्यामुळे मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गहमादेवी यांनी पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही त्यामुळे त्यांनी चितेत उडी घेऊन जीव दिला. विशेष म्हणजे त्याठिकाणी असणा-या गावक-यांनी त्यांना वाचवण्याऐवजी आणकी काही लाकडे चितेत टाकली. त्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.
कुटुंबीयांच्या मते गहवा देवी तिच्या पतीवर खूप प्रेम करायची. पतीचा मृत्यू झाल्यानंतर आपणही त्याच्याबरोबर जाणार असे ती वारंवार सांगायची. पोलिसांनीही घटनेला दुजोरा दिला आहे.