आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान; जाणून घ्या,कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्याधीश आणि किती गुन्हेगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तरप्रदेशात दुसर्‍या टप्प्यात आज, बुधवारी मतदान होत आहे. 67 जागांसाठी 721 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात 256 उमेदवार हे कोट्याधिश आहेत तर 107 उमेदवार गुन्हेगार आहे. मुस्लिम बहुल भागात मतदान होत असल्याने 2 लाखांहून जास्त जवान या भागात तैनात करण्यात आले आहेत.  यात सेंट्रल सिक्युरिटी फोर्सेसच्या 800 तुकड्यांचा समावेश आहे.

यूपीचे मुख्य निवडणूक अधिकारी‍ टी व्यंकटेश यांनी सांगितले की, शांततेत आणि निष्पक्ष मतदानासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये 70 जागांपैकी 69 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. मतदान 8 वाजता सुरु होईल. एका उमेदवाराचे निधन झाले आहे.

जाणून घ्या... यूपीमधील दुसर्‍या टप्प्यात काय आहे खास... 

1# दुसर्‍या टप्प्यात किती मतदार
- 2, 28, 57,081 मतदार  
- 1.23 कोटी पुरुष 
- 1.04 कोटी महिला
- 1068 थर्ड जेंडर

2# किती उमेदवार
एकूण उमेदवार- 721
गुन्हेगार उमेदवार - 107
कोट्याधिश उमेदवार- 256

3# कोण्याच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात
सप 51
बीएसप 67
भाजप  67
काँग्रेस 18
रालोद  52
इतर 466

4# 2012 मध्ये कोणाला, किती जागा? 
- 2012 मध्ये बसपला 18, सपला 34, भाजपला 10, काँग्रेसला 3, अपक्ष- 2 जागा मिळाल्या होत्या.

5# सर्वात जास्त गुन्हेगार उमदेवार कोणत्या पक्षात?
- एडीआरच्या अहवालनुसार, 721 मध्ये 719 उमेदवारांचे रेकॉर्ड अॅनालिसिस करण्‍यात आले. त्यापैकी 107 वर गुन्हे दाखल आहेत. यात 84 वर गंभीर गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. सपने सर्वात जास्त 41 टक्के गुन्हेगार उमेदवार मैदानात उतरले आहे. सपच्या 51 पैकी 21 उमेदवारांवर गुन्हे आहेत. 
- बसपने आपले 67 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात 37 टक्के अर्थात 25 उमेदवारांवर गुन्हे आहेत. तर काँग्रेसच्या 18 पैकी 6 आणि रालोदच्या 52 पैकी 6 उमेदवारांवर गुन्हे आहेत.

6# कोणत्या पक्षाचे उमेदवार सर्वात धनाढ्य?
- 719 पैकी 256 उमेदवार कोट्याधिश आहेत. एडीआरच्या अहवालानुसार,सर्वात धनाढ्य उमेदवार बसपचे नवाब काझिम अली खान आंहेत. त्यांच्याकडे 97 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रीय परिवर्तन दलचे उमलेश यादव (55 कोटी) तर  तिसर्‍या क्रमांकावर बसपचे मो. नासिर (38 कोटी) आहे. 
- बसपने दुसर्‍या टप्प्यात कोट्याधिश उमेदवार रिंगणात उतरवले आहे. पक्षाचे 67 पैकी 58 अर्थात 87% उमेदवार कोट्याधिश आहेत. 
- भाजपने 50 अर्थात जवळपास 75 टक्के उमेदवार कोट्याधिश आहेत. सपचे 51 पैकी 45 अर्थात 88% उमेदवार कोट्या‍धिश आहेत. काँग्रेसच्या 18 पैकी 13 आणि रालोदच्या 52 पैकी 15 उमेदवार कोट्याधिश आहेत. 
- या टप्प्यात 206 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 36 अर्थात 18 टक्के उमेदवार कोट्याधिश आहेत. 

7# कोणत्या मुद्द्यावर लढवली जात आहे निवडणूक ?
- दुसर्‍या टप्प्यात 67 जागांसाठी कायदा आणि सुव्यवस्था (लॉ अॅण्‍ड ऑर्डर) हा मुद्दा अजेंड्यावर आहे. 
- मात्र, भाजपने ईव्ह टीजिंग आणि स्लॉटर हाऊसच्या मुद्यावर आपल्या कॅम्पेनमध्ये जोर दिला आहे.

8# कोण ठरवेल विजय-पराजय?
- बिजनौर, संभल, रामपूर, मुरादाबाद, बरेली आणि बदायूं सारख्या जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. हे जिल्हे अतिसंवेदनशिल मानले जातात.  
- या टप्पात निर्णायक मतदार देखील अल्पसंख्यकच आहेत. 67 मधील 60 जागा या मुस्लिम बहुल भागात आहेत. रामपूरमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. 
- जवळपास सर्व पक्षांनी किमान 64 मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले आहेत. 15 जागांवर सप-काँग्रेस, बसप आणि रालोदने सर्व मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

9# या जिल्ह्यात होत आहेत मतदान... 
- सहारनपूर, मुरादाबाद, बिजनौर, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, पीलीभीत, लखीमपूर खीरी, शाहजहांपूर आणि बदायूं. 
 
उत्तराखंडमध्ये किती गुन्हेगार, किती कोट्याधिश उमेदवार?
- एडीआरच्या रिपोर्टनुसार, उत्तराखंडमध्ये 637 पैकी 91 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 54 वर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. 
- 637 पैकी 200 अर्थात 31 टक्के उमेदवार कोट्याधिश आहेत.

उत्तराखंडमध्ये सर्वात धनाढ्य उमेदवार कोण?
- भाजपचे सतपाल महाराज उत्तराखंडमधील सर्वात धनाढ्य उमेदवार आहे. त्यांच्याकडे 80 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. यानंतर अपक्ष उमेदवार मोहन प्रसाद काला यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे 75 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. भाजपचे शैलेंद्र मोहन सिंघल यांचा धनाढ्य उमेदवारांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. सिंघल यांच्याकडे 35 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे.

उत्तराखंडमध्ये सर्वात जास्त गुन्हेगार कोणत्या पक्षात? 
- काँग्रेसच्या 12, भाजपच्या 10, बसपच्या  6, यूकेडीच्या 3, सपच्या 2  आणि 14 अपक्ष उमेदवारांवर गुन्हे आहेत.
 
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
- भाजपचे 70, काँग्रेसचे 70, बसपचे  69, यूकेडीचे 55, सपचे 20 आणि अपक्ष 353 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2012 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप - 31
काँग्रेस - 32
बसप- 3
यूकेडी - 1
इतर- 3
 
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...यूपीमध्ये दुसर्‍या टप्प्यात 3 सर्वात मोठे कोट्याधीश आजमावत आहेत नशीब...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...