आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा महिन्यांत 190 दहशतवादी ठार; काश्मिरात 10 वर्षांत सर्वाधिक संख्या; दहशतवाद्यांमध्‍ये 80 स्थानिक युवक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कर काश्मीरमध्ये सुपर-५० कार्यक्रमही चालवत आहे. - Divya Marathi
लष्कर काश्मीरमध्ये सुपर-५० कार्यक्रमही चालवत आहे.

श्रीनगर- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची ऑल आऊट ही मोहीम यशोमार्गावर आहे. शनिवारी लष्कराने काश्मीर खोऱ्यात ६ अतिरेक्यांना ठार केले होते. गेल्या १० वर्षांत या वर्षी १० महिन्यांत सर्वात जास्त दहशतवादी काश्मीरमध्ये मारले गेले. लष्कराच्या माहितीनुसार, या वर्षी आतापर्यंत १९० अतिरेकी मारले गेले. १५ कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल जे. एस. संधू आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद यांनी संयुक्तपणे सांगितले की, ठार झालेल्या १९० दहशतवाद्यांत ८० स्थानिक, तर ११० विदेशी आहेत. त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी आहेत. लष्कराने ६६ अतिरेक्यांना या वर्षी एलओसीवर घुसखोरीदरम्यान ठार केले. 


ऑल आऊट मोहिमेचा उद्देश जम्मू-काश्मीरला हिंसा आणि दहशतवादापासून मुक्ती हा आहे. दहशतवादाचा मार्ग धरलेल्या युवकांना हा मार्ग सोडण्याचे आवाहनही लष्कर करत आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना प्रेरित केले जात आहे. जे युवक दहशतवादी संघटनांत आहेत, त्यांना परतण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांना त्रास दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले जात आहे.

 

> फुटबॉलपटू असलेला माजिद इर्शाद शरण आल्यानंतर लष्कराशी संबंधित आशिक हुसेन भट व मंजूर अहमद बाबाच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी येण्याचे आवाहन केले आहे.

> एलओसीवर घुसखोरी करताना ६६ दहशतवादी ठार

> ५००० वर दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये थांबले आहेत.

> ११०० अतिरेक्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

> १० दहशवादी काश्मीरमध्ये गेल्या २२ महिन्यांत शरण आले आहेत.

 

काश्मीरमध्ये लष्कराचे ऑपरेशन ऑल आऊट 

काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराने ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतले आहे. त्यात या वर्षी सुमारे १९० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार झालेल्यांत ८० स्थानिक दहशतवादी आहेत, तर ११० विदेशी आहेत. त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी नागरिक आहेत. लष्कराने ही कारवाई या वर्षी जानेवारीत सुरू केली होती. गेल्या १० वर्षांत या वर्षी सर्वाधिक दहशतवादी मारले गेले. लष्कराची ही मोहीम आता पूर्ण होणार आहे.

 

ऑपरेशन ऑलआऊट आता शेवटच्या टप्प्यात
ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत लष्कर दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांचा अंतिम तळ नष्ट करत आहे. तेथे शोपियां जिल्हा अतिरेक्यांचे सुरक्षित स्थान समजले जात होते. तेथे त्यांच्या कारवाया खुलेआम दिसतात. लष्कर येथे नव्या छावण्या स्थापन करत आहे. सीआरपीएफच्या बटालियनही तैनात केल्या आहेत.

 

नोटबंदी, एनआयएच्या छाप्यांमुळे दगडफेक ९०% पेक्षा कमी
जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद यांनी अलीकडेच सांगितले होते की या वर्षी खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांत ९०% घट झाली आहे. त्यांनी या सुधारणेचे श्रेय काश्मिरी जनतेला दिले होते. एनआयएचे छापे, नोटबंदी आणि दहशतवादी कमांडरच्या विरोधात कारवाईमुळेही दगडफेकीच्या घटना कमी झाल्या. गेल्या वर्षी १ दिवसात अशा ४०-५० घटना होत असत. पण आता अशा घटनांत ९०% घट झाली आहे.

 

अद्याप ६८ अतिरेकी शिल्लक
लष्कराने ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत खोऱ्यात २५८ अतिरेक्यांची यादी तयार केली आहे. त्यापैकी १९० मारले गेले आहेत. ६८ शिल्लक आहेत. त्यात १३० स्थानिक, १२८ विदेशी आहेत. १३६ लष्करशी, ९५ हिजबुलशी आणि २३ जैश-ए-मोहंमद संघटनेशी संबंधित आहेत.

 

तीन वर्षांनंतर संवादक
जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती सुधारण्यासाठी सरकारने गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मांना संवादक केले आहे. ते फुटीरवाद्यांशी चर्चा करतील. मोदी सरकारने प्रथमच संवादक नेमला आहे.

 

 

खाेऱ्यात बदल हाेताेय, युवकांची दगडफेकीत नव्हे, तर खेळात रुची

काश्मीर खाेऱ्यातील वातावरण अाता खूप बदलत अाहे. तरुणाईतही माेठा बदल हाेताेय. कालपर्यंत दगडफेक करणारी तरुणाई अाता खेळात रस घेऊ लागलीय. जे युवक मार्ग चुकलेत त्यांना परत अाणण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. शरण येणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. अशा युवकांना तुरुंगाएेवजी सुधारगृहात पाठविण्यास गृह मंत्रालयही राजी अाहे. लष्कर मदत करत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी हे प्रयत्न. लाेकांशी संपर्क वाढवला जाताेय.  खेळांना प्राेत्साहन दिले जातेय. अंडर-१४, अंडर-१९ स्पर्धा घेतल्या जाताहेत. त्यात माेठ्या संख्येने तरुण जाेडले जात अाहेत. शाळांतही क्रीडा साहित्य पाेहाेचवले जात अाहे. पाेलिसही मदत करत अाहेत. नुकताच एक मुलगा परत अाला. इतर कुटुंबीयांनाही त्यांच्या मुलाला घरी परत बाेलाविण्यासाठी प्रवृत्त केले जात अाहे, अन्यथा अाज ना उद्या त्यांचे एन्काउंटर हाेऊ शकते. एनअायएच्या छाप्यांचाही परिणाम झालाय. सुरक्षा दलांच्या समन्वयामुळे हे शक्य हाेत अाहे. बर्फवृष्टीमुळेही घुसखाेरीचे प्रमाण कमी झालेय.

- राजेश यादव, कमांडंट, सीआरपीएफ प्रवक्ते

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, 5 वर्षांत ठार झालेल्‍या अतिरेक्‍यांची आकडेवारी...

बातम्या आणखी आहेत...