आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या रात्री यांना शोधतात तांत्रिक, जाणून घ्या काय असतात 'पायाळू'बाबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या रात्री तांत्रिक पायाळूंचा शोध घेत असल्याचा प्रवाद आहे. - Divya Marathi
दिवाळीच्या रात्री तांत्रिक पायाळूंचा शोध घेत असल्याचा प्रवाद आहे.
या बातमीचा उद्देश वाचकांना अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथेबद्दल जागृत करणे आहे. हे वाचकांच्या माहितीसाठी आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.
 
इंदूर - दिवाळी फक्त पूजा आणि आतषबाजीसाठी नसते. दिवाळी रात्री तांत्रिक मोठमोठ्या तंत्रक्रिया करतात. दिवाळीच्या आधी तांत्रिक पायाळूच्या शोधात बिझी होतात. एका रात्रीसाठी पायाळू मूल मिळावे म्हणून तांत्रिक लोक त्याच्या आईवडिलांना लाखो रुपये द्यायला तयार होतात. 
DivyaMarathi.Com ने अध्यात्म आणि तंत्राच्या काही विशेषज्ञांशी चर्चा करून हे जाणण्याचा प्रयत्न केला की, पायाळू असते काय? त्यांची ओळख काय असते? आणि यांच्यासाठी लाखो रुपये द्यायला का तयार होतात तांत्रिक-मांत्रिक?

> इंदूरच्या संस्कृत कॉलेजचे माजी प्राचार्य तसेच वेद, शास्त्र आणि पुराणाचे विद्वान डॉ. विनायक पांडेय म्हणाले की, पायाळू लोक साधारण माणसापेक्षा वेगळे असतात. त्यांच्यात निसर्गदत्त विलक्षणता असते. साधारणपणे जन्माच्या वेळी आईच्या गर्भातून बाळाचे डोके अगोदर बाहेर येते, पण काहींचे जन्माच्या वेळी अगोदर पाय बाहेर येतात, मग धड आणि शेवटी डोके येते. अशाच बालकांना तंत्राच्या भाषेत पायाळू अथवा पगपायला म्हटले जाते.
> अंघोर तंत्राचे काही तांत्रिक मानतात की, पायाळू बाळाच्या माध्यमातून तंत्रक्रिया उत्तमरीत्या होऊ शकते. काही तांत्रिक त्यांना माध्यम बनवून तंत्राच्या माध्यमातून अज्ञात रहस्यांना शोधल्याचा दावा करतात, परंतु यात किती सत्यता आहे याचा दावा कुणीही करू शकत नाही.

पायाळूच्या माध्यमातून शोधतात खजिना, धन आणि लॉटरी किंवा सट्ट्याचा नंबरही
> सामान्य माणूस पायाळूची ओळख पटवू शकत नाही. त्याची ओळख एखादा तांत्रिक वा आध्यात्मिक उंचीची व्यक्तीच पटवू शकते. ज्योतिष्याचे काही विद्वानही अनेकदा पत्रिका पाहून आईवडिलांना सांगतात की, त्यांचा मुलगा पायाळू आहे. अघोरी तंत्राचे तांत्रिक एखाद्या पायाळूला पाहताच ओळखतात. 
> तांत्रिकांमध्ये मान्यता आहे की, पायाळूवर उच्चाटन, मोहन आणि वशीकरण केले तर ते अशा स्थितीत पोहोचतात जेथून त्यांना सर्वकाही दिसू लागते. तंत्राचे प्रयोग करून तांत्रिक त्याच्या माध्यमातून लपलेला खजिना, हरवलेली वस्तू, एवढेच काय लॉटरी वा सट्ट्याचा नंबरही शोधत असल्याचा दावा करतात.
> याच आमिषांमुळे अनेक लोक आपली मुले तांत्रिकांच्या हवाली करतात. जर मायबाय तयार झाले नाही तर तांत्रिक दिवाळीच्या दिवशी आणि रात्रीसाठी त्यांना मिळवण्यासाठी मुलाच्या आईवडिलांना लाखो रुपये द्यायला तयार होतात. अशीही काही प्रकरणे आहेत, जेव्हा आईबाप तयार न झाल्याने मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. तंत्रक्रियेनंतर या बालकांना सोडून देण्यात आले होते.
 
विलक्षण प्रतिभेचे धनी असतात पायाळू...
> डॉ. पांडेय यांच्या मते, पायाळू सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळे असतात. त्यांच्यात विलक्षणता असते. त्यांच्यातील चेतना इतरांपेक्षा चांगली असते. ते निसर्गाच्या जवळ असतात. त्यांच्या पूर्वाभासाची क्षमता असते. अनेकदा त्यांना भविष्यात होणाऱ्या घटनांचा आभास होतो. 
> शास्त्रांचे अभ्यासक डॉ. पांडेय म्हणाले की, वेद आणि शास्त्रांमध्ये या तऱ्हेच्या प्रयोगांना खूपच निंदनीय मानण्यात आले आहे. वैदिक विद्वान तर सोडाच, अंघोर तंत्राचा खरा साधकही या प्रकारचे अभद्र प्रयोग कधीच करत नाही.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...