आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातेय, आसारामबापू महान संत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी व गेल्या २३ महिन्यांपासून जोधपूरच्या तुरुंगात असलेले आसारामबापू हे महान संत आहेत, असे धडे राजस्थानातील तिसरीच्या मुलांना दिले जात आहेत. दिल्लीच्या एका प्रकाशकांनी तयार केलेल्या नैतिक शिक्षणाच्या पुस्तकात हा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. एनसीईआरटी व सीसीई पॅटर्नवर आधारित या पुस्तकात देशासाठी अमूल्य योगदान देणारे महात्मे व संतांचा उल्लेख आहे. त्यात अासारामबापूंचाही उल्लेख आहे. हे पुस्तक सध्या जोधपूरमधील ८० पेक्षा जास्त शाळांमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. नवी दिल्लीच्या गुरुकुल एज्युकेशन बुक्सच्या वतीने नैतिक शिक्षण व सामान्यज्ञानाचे हे पुस्तक काढण्यात आले असून त्यात "नया उजाला' या धड्यात वरील उल्लेख आहे.

पान क्रमांक ४० वर संतांचे फोटो व परिचय आहे. त्यात गुरुनानक, भगवान महावीर, कबीर, विवेकानंद, मदर तेरेसा, मीराबाई, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस, दयानंद सरस्वती, बाबा रामदेव यांच्याबरोबरीने अासारामबापूंचाही फोटो आहे.