आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: एअरपोर्टवर चाहत्यांवर भडकला सचिन, म्हणाला- चला हटा, एका बाजूला व्हा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - क्रिकेटच्या खेळात देवाचा दर्जा मिळालेला भारतरत्न सचिन तेंडुलकर सोमवारी सकाळी जोधपूरला पोहोचला होता. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी जोधपूरला आलेल्या सचिनला एअरपोर्टवर त्याच्या चाहत्यांनी घेरले. सचिनने स्वत: लोकांना एका बाजूला व्हा म्हणत कारमध्ये जाऊन बसला. काही चाहत्यांनी सेल्फीचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिल्याविना तो थेट हॉटेलसाठी रवाना झाला.
 
या कारणामुळे जोधपूरला आला सचिन...
- क्रिकेटमधून संन्यास घेतलेला राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी जोधपूरला आला होता. तो जोधपूरला पोहोचल्याची माहिती चाहत्यांना अगोदरपासूनच होती. यामुळे आपल्या क्रिकेटच्या देवाची एक झलक मिळवण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. 
- कडक सुरक्षेच्या घेऱ्यात असलेल्या सचिनने स्वत: लोकांना थोडे दूर व्हा असे म्हटले. तरीही लोक त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिले. यामुळे नेहमी शांत राहणारा सचिन चिडला आणि त्याने सर्वांना एका बाजूला व्हायला सांगितले.
- यानंतर सचिन सुरक्षेसाठी तैनात पोलिस अधिकाऱ्याला काहीतरी म्हणाला आणि इशाऱ्याने त्यांना एका बाजूला करण्यासठी सांगितले. सचिनच्या सुरक्षेला लक्षात घेऊन कारला गेटच्या एकदम जवळ आणण्यात आले. यानंतर सचिन थेट कारमध्ये जाऊन बसला.
 
जोधपूरमध्ये ठोकली आहेत शतके...
- जोधपूरवासीयांनी सचिनच्या फलंदाजीचा जलवा पाहिलेला आहे. 8 डिसेंबर 2000 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध जोधपूरमध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने 146 धावांची शानदार फलंदाजी केली होती. एकदिवसीय सामन्यांत त्याचे हे 27 वे शतक होते. तथापि, भारत मॅच हरला होता. परंतु सचिनचे ते शतक अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...