आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Incident In Rajastan : God Not Seeing Because Of This Family Take Poision

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानमधील घटना : देव दिसला नाही म्हणून कुटुंबाने घेतले विष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर सिटी (राजस्थान) - शहरातील एका कुटुंबाने भगवान शंकराच्या दर्शनासाठी व प्रकट व्हावेत यासाठी यज्ञ केला, परंतु प्रार्थना करूनही शंकर प्रकट न झाल्याने कुटुंबातील आठ सदस्यांनी विषमिश्रित लाडू प्रसाद म्हणून खाल्ले व आत्महत्या केली. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रण त्यांनी करून ठेवले आहे.


गंगापूर सिटी येथे नसिया कॉलनी येथे कंचन सिंह राजपूत व कुटुंबातील सदस्यांनी सोमवारी रात्री यज्ञ केला होता. त्यानंतर विषमिश्रित लाडू खाल्ले. त्यात कंचन सिंह (45), त्यांच्या पत्नी नीलम (40), मुलगी ड्रिमी (16), मुलगा प्रद्युम्न (11), छोटा भाऊ दीपसिंह (40) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कंचनची आई भगवती देवी, दीपसिंहचा मुलगा लव, भाची रश्मी हे बेशुद्ध झाले. पैकी रश्मीला काही वेळाने शुद्ध आल्यानंतर तिने पोलिस व अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला.