आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग: दांपत्याला मारून झाडाला लटकवले, बापाने दाबला मुलीचा गळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोतिहारी जिल्ह्यातील गावात स्वतःच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची गळादाबून हत्या केल्यानंतर राजन प्रसादने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. - Divya Marathi
मोतिहारी जिल्ह्यातील गावात स्वतःच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची गळादाबून हत्या केल्यानंतर राजन प्रसादने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पाटणा - बिहारमधील समस्तीपूर आणि मोतिहारी जिल्ह्यात ऑनर किलिंगच्या दोन घटना घडल्या आहेत. समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिपूरच्या कापर चवर येथे शुक्रवारी एक जोडप्याचे झाडाला लटकवलेले मृतदेह दिसले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, दोघेही आलमपूर गावातील रहिवासी होते. दीपक कुमार आणि मधुप्रिया यांचे एकमेकांवर प्रेम होते. दीपकचे पाटण्यात शिक्षण सुरु होते, तर मधुप्रियाने समस्तीपूर येथून इंटर केल्यानंतर गावातच राहात होती.
विभूतीपूरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, ही घटना ऑनर किलिंगची असली पाहिजे. झाडाच्या चारही बाजूला पाणी आहे, मात्र दोघांच्याही पायाला माती लागलेली नाही. मुलगा किंवा मुलीच्या कुटुंबीयांपैकी कोणीही अद्याप तक्रार दिलेली नाही.
दुसरी घटना : गळा अवळून केली मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या
मोतिहारी जिल्ह्यातील ममरखा गावातिल शत्रुघ्न रामचे बडहरवा गावातील शालु कुमारीवर प्रेम होते. पोलिसांच्या माहितीनूसार, गुरुवारी रात्री युवतीचे वडिल राजन प्रसादने दोघांना आक्षेपार्ह्य स्थितीत पकडले होते. त्यानंतर त्याने शत्रुघ्न आणि मुलगी शालुची गळा दाबून हत्या केली. दोघांना मारल्यानंतर त्याने स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले.
आरोपीने पोलिसांना सांगितले, माझी मुलगी शालु आणि शत्रुघ्नचे सहा महिन्यापासून अफेअर सुरु होते. आम्ही मुलाच्या कुटुंबीयांना त्याला समजावण्यास सांगितले होते. आरोपी राजन प्रसाद म्हणाला, दोघांच्या हत्येचा मला थोडाही पश्चताप नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रेमी जोडप्याची हत्याकरुन झाडाला लटकवले
बातम्या आणखी आहेत...