आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपायकारक वस्तूंच्या यादीत विडीचा समावेश व्हावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून या पत्रामध्ये वस्तू आणि सेवा करांतर्गत (जीएसटी) विडीसह तंबाखू उत्पादनाचा ‘अपायकारक वस्तू’च्या यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व पदार्थांवर एक समान कर लावण्याची विनंती केली आहे. देशभरात धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्वस्तात मिळणारी तंबाखू हे सर्वात मोठे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
सरकार साहाय्यता प्राप्त राष्ट्रीय कर्करोग ग्रीड (एनसीजी)च्या नेतृत्वात १०८ कर्करोग रुग्णालयांतील कर्करोगतज्ज्ञांनी  जीएसटी  परिषदेच्या बैठकीआधी ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या  अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीत होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तू आणि सेवांवर जीएसटी दर निश्चित होण्याची शक्यता आहे.  
 
गेल्या काही दिवसांपासून आलेल्या वृत्तानुसार तंबाखू शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता सरकार विडीला अतिरिक्त सेसच्या यादीच्या तसेच ‘अपायकारक वस्तू’च्या यादीतून बाहेर ठेवण्याची शक्यता आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक आर. ए. बडवे आणि याच रुग्णालयातील कर्करोग सर्जन आणि एलएनजीचे संयोजक प्रमेश सी. एस. यांनी शनिवारी ही माहिती दिली.
 
पंतप्रधान मोदींना तज्ज्ञांनी लिहिलेल्या पत्रातील तर्क 
- नुसती विडी ओढल्यामुळे दरवर्षी ६ लाख व्यक्तींचा मृत्यू हाेतो. प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित मृत्यूचा आकडा पाहिल्यास याचे प्रमाण ६० टक्के आहे. 
 
- तंबाखू उत्पादनावर सध्या असलेला कर, डब्ल्यूएचओच्या सूचनेच्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे. जीएसटी ही विसंगती सुधारण्याची चांगली संधी आहे. 
 
- तंबाखूमुळे प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो, तर प्रत्येक तिसरी वयस्कर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करते. 
 
- आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०११ मध्ये तंबाखूचा वापर करण्यासाठी  एकूण अार्थिक गुंतवणूक १.०५ लाख कोटी रुपये किंवा जीडीपीच्या १.१६ टक्क्यांच्या बरोबर राहिली.
 
- हा आकडा केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित आरोग्याच्या अर्थसंकल्पाच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर तंबाखूपासून मिळणाऱ्या उत्पादन शुल्काचा आकडा याच्या तुलनेत केवळ १७ टक्के होता.
बातम्या आणखी आहेत...