आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Department Raids Tamil Film Actor Vijay House

120 कोटींचा PULI प्रदर्शित होण्याआधी स्टारकास्टच्या घरी IT चा छापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता विजय - Divya Marathi
अभिनेता विजय
चेन्नई - आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी साऊथ सुपरस्टार विजय सह 'पुली' चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टच्या घरी छापा टाकला आहे. पुली गुरुवारी प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या एक दिवस आधी आयटी विभागाची ही धाड पडली आहे. श्रीदेवी, हंसिका मोटवानी, श्रुति हसन आणि विजय स्टारर 'पुली'च्या निर्मीतीसाठी 120 कोटी रुपये खर्च आला आहे. अभिनेता विजयच्या करिअरमधील ही सर्वात मोठे बजेट असलेली ही फिल्म आहे. तंत्रज्ञान आणि इफेक्ट्सच्या बाबतीत 'बाहुबली'ला टक्कर देणारा हा चित्रपट मानला जात आहे. बाहुबली चित्रपट देखील साऊथमध्येच तयार झाला होता. त्याने 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता.

तीन राज्यांमध्ये 35 ठिकाणी छापे
अभिनेता विजयच्या घर आणि रिसॉर्टसह पुलीचे दिग्दर्शक चिंबू देवान, निर्माते शिबू थामीन्स, सेल्वाकुमार, मदुरई अन्बू आणि वित्त पुरवठादार रमेश यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहे. टॅक्स चोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानूसार या चित्रपटातील कलाकारांच्या आणि क्रु मेंबर्स घरी छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप त्यांची नावे समोर आलेली नाहीत. आयएएनएस वृत्तसंस्थेने सुत्रांच्या माहितीनूसार सांगितले आहे की चित्रपटात अशीकाही गुंतवणूक करण्यात आली आहे ज्यांच्या स्त्रोतांबद्दल कोणतीच माहिती नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि नयनतारा यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे. तामिळनाडू, केरळ आणि हैदराबाद येथे जवळपास 35 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'पुली'ची स्टारकास्ट