आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Officers Came Like Wedding People In Jaipur News In Marathi

वराती बनून छापा टाकण्यासाठी आले प्राप्तीकर विभागाचे अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर- वार- बुधवार, वेळ सकाळी 11 वाजेची. राजस्थानमधील सूरतगडहून रायसिंहनगरला एक वरात निघाली. फुलांची सजलेल्या एका कार मागे आणखी सहा गाड्या होत्या. जवळपास दीड तासांत सर्व गाड्या रायसिंहनगरात दाखल झाल्या. परंतु शहरात गाड्या प्रवेश करतात वेगवेगळ्या दिशेला वळल्या. दरम्यान, या गाड्या वरातीच्या नसून त्या प्राप्तीकर विभागाच्या गाड्या निघाल्या. वराती बनून प्राप्तीकर अधिकारी आले होते.
सुरतगड जिल्ह्यात करा बुडव्याविरोधात एक अभियान सुरु करण्यात आले आहे. परंतु, अधिकारी छापेमारी करण्यापूर्वीच व्यापारी तसेच उद्योगपतींना आधीच माहिती मिळून जाते. त्यामुळे अधिकार्‍यांनी वराती बनून छापामारी करण्याची शक्कल लढवली. अधिकार्‍यांच्या नव्या अंदाजाची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.
प्राप्तीकर अधिकार्‍यांनी काही कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली. चौकशी सुरु आहे. आणखी दोन दिवस ही चौकशी सुरु राहाणार असल्याचे श्रीगंगानगरचे सहआयुक्त एन.आर.कपूर यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, यांच्यावर आधीपासून होती नजर...