आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्कमटॅक्स नियम सोपे हाेणार; सरकारने स्थापली 6 सदस्यीय समिती, 6 महिन्यांत अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्राप्तिकर आणि कॉर्पाेरेट कर पद्धती सोपी करण्यासाठी सरकारने सीबीडीटीचे सदस्य अरविंद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती स्थापली आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, समिती सध्याच्या कायद्यांचा आढावा घेऊन नव्या कायद्याचा मसुदा तयार करेल. सप्टेंबरमध्ये कर अधिकाऱ्यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राप्तिकर कायद्यात बदलांची गरज व्यक्त केली होती. सध्याचा कायदा १९६१ मध्ये लागू झाला होता. 


ही समिती ६ महिन्यांत अहवाल देईल. ती इतर देशांच्या प्राप्तिकर कायद्यांचीही माहिती घेईल. तसेच देशाच्या आर्थिक गरजांनुसार विद्यमान कायद्यांत काय बदल करण्याची गरज आहे, यावर लक्ष देईल. सध्या कर सवलतीची वार्षिक मर्यादा अडीच लाख रुपये आहे. ८ वर्षे जुन्या यूपीए सरकारच्या प्रत्यक्ष कर विधेयकात सवलत मर्यादा २ लाख करण्याचा प्रस्ताव होता.

बातम्या आणखी आहेत...