आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कशी आणि कुठे-कुठे आहे भारत-पाकिस्‍तान सीमा, जाणून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोटमधील हवाई दलाच्‍या तळावर दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. हे दहशतवादी भारतात कसे घुसले, त्‍यांनी शस्‍त्र कशी आणली, असे अनेक प्रश्‍न उपस्‍थ‍ित झाले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com या विशेष वृत्‍तमालिकेतून सांगणार आहे भारताच्‍या आंतरराष्‍ट्रीय सीमेबद्दल. त्‍यातील दुसऱ्या भागात पाकिस्‍तान सीमेबद्दल माहिती...
अनेक राज्‍यात लागते भारत-पाकिस्‍तान सीमा
भारतातील पंजाब, गुजरात, राजस्‍थान आणि काश्मिर या राज्‍यांना पाकिस्‍तानची सीमा लागते. शिवाय पाकिस्‍तातून समुद्री मार्गे मुंबईत घुसखोरी करता येते.
नेमका कुठे आहे पाकिस्‍तान ?
भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नैर्‌ऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र व ओमानचे आखात असून देशाला 1046 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
अशा आहे सीमेचे क्षेत्रफळ
राज्‍य सीमेची लांबी (किमीमध्‍ये )
जम्‍मू-काश्मिर - 1225
पंजाब - 553
राजस्‍थान - 1037
गुजरात - 508
एकूण - 3323

पुढील स्‍लाइड्स वर जाणून घ्‍या भारत पाकिस्‍तानची सीमेची माहिती...