आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाभ्यास : दहशतवाद्यांचा भारत-रशियावर हल्‍ला, जवानांच्‍या हेलिकॉप्टरमधून उड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरावाची क्षणचित्रे. - Divya Marathi
सरावाची क्षणचित्रे.
जोधपूर - अवघ्‍या 50 उंबरठ्याचे गाव. अचानक आकाशात सैन्‍य दलाचे लढाऊ विमाने घिरट्या घालायला लागले. त्‍यातून काही जवान दोराच्‍या साहाय्याने जमिनीवर उतरले तर काहींनी पॅराशुटची मदत घेतली. कंबरेला हातबॉम्‍ब, हातात रायफल होती. जवानांनी गावातील घरांत सर्च मोहीम सुरू केली. दरम्‍यान, गावात लपलेल्‍या दहशतवाद्यांनी घराला आग लावली आणि हेलिकॉप्‍टरच्‍या मदतीने पळून जाण्‍यात यश मिळवले. यात दहशतवाद्यांचा प्रमुखही होता. एकच धांदल उडाली. दरम्‍यान, सैन्‍याची अतिरिक्‍त तुकडी आली. डॉग स्‍कॉडच्‍या मदतीने बॉम्‍ब शोधले गेले. हे सर्व संभाव्‍य दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या युद्धसरावासाठी होते. यात भारत आणि रशियाच्‍या जवानांनी एकत्र सराव केला.
बंधक बनवलेल्‍या ग्रामस्‍थांना सोडवण्‍यासाठी सराव
दहशतवाद्यांनी तर एखाद्या गावात घुसून ग्रामस्‍थांना बंधक बनवले तर त्‍यांना कसे सोडवता येईल, यासाठी हा युद्धसराव करण्‍यात आला. जवानांनी अवघ्‍या दीड तासांत ग्रामस्‍थांची मुक्‍तता केली. भारताचे रेड ईगल डिव्‍हीजनचे मेजर जनरल पी.सी.थमैया आणि रशियाचे मेजर जनरल ग्रिजोल्व ब्लादमीर यांच्‍या नेतृत्‍वात ही मोहीम पार पडली.
सरावादरम्‍यान पहिल्‍यांदाच ड्रोनचा वापर
युद्धाच्‍या सरावादरम्‍यान या मोहिमेत पहिल्‍यांदाच ड्रोनचा वापर करण्‍यात आला. सेनेने ड्रोनच्‍या मदतीने ही मोहीम फत्‍ते केली. ड्रोनमध्‍ये प्रोसेसर, जीपीएस, कॅमरा आणि ट्रांसमीटर होते. त्‍यामुळे गावातील संपूर्ण हालचाली जवानांना मॉनिटरवर दिसत होत्‍या.
पुढील स्लाइड्सवर पाहा युद्ध सरावाचे फोटोज...