आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी जिवंत हाती लागला; पाकच्या कुरापतखोरीचा पुरावा, २ जवान शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-उस्मान ऊर्फ कासीम खान या अतिरेक्याला जिवंत पकडल्याने पाकिस्तानचा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. पाकिस्तानच्या कासीम आणि नावेद ऊर्फ मोमीन यांनी बुधवारी सकाळी जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला केला. याच महामार्गावरून काही वेळ आधीच अमरनाथ यात्रेकरूंचा गट निघाला होता. भारतीय लष्कराने नावेद या अतिरेक्याला ठार मारले, तर कासीमला जिवंत पकडले. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून ११ जण जखमी आहेत.
२००८ मध्ये कसाब पकडला गेल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पाकिस्तानी अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता दोन अतिरेक्यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर बीएसएफच्या वाहनावर हल्ला केला. गोळीबारात बसमध्ये बसलेले १३ जवान जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नावेद मारला गेला. पोलिस, लष्कराची पथके घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत कासीम जंगलाकडे पळून गेला. पण ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पुढील स्लाइडवर वाचा, मेहुणा-शालक जोडीने पकडले