आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Cancels Visa For Uyghur Dissident Dolkun Isa

भारताची चीनसमोर माघार, डोल्कुनचा व्हिसा नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- उइघूर नेता डोल्कनला भारताने व्हिसा नाकारला आहे. सरकारच्या या भूमिकेवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, ‘भारत सरकारचे धोरण दुभंगलेल्या वृत्तीचे आहे.

चीनने याला विरोध दर्शवल्यावर भारताने डोल्कुनचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी भारताने व्हिसा देण्यावरून शेखी मिरवली होती त्याचे काय झाले? ’ चीनविषयीचे सरकारचे धोरण इतके दिवस कसे होते हे आपण पाहिल्याचे नॅशनल काॅन्फरन्सचे सर्वेसर्वा आेमर म्हणाले. भारताने चीनच्या विरोधापुढे माघार घेतल्याचा सूर आेमर यांनी ट्विटरवर आळवला.

चीनने डोल्कुनला दहशतवादी म्हणून घोषित केले. तो जर्मन नागरिक असून हिमाचल प्रदेशात होत असलेल्या धर्मशाळा येथील ‘वर्ल्ड उइगुर काँग्रेस’ या परिषदेत सहभागी होण्याची परवानगी भारताने दिली होती. २८ एप्रिल ते १ मेदरम्यान ही परिषद होणार आहे. यादरम्यान इसाने दलाई
लामांचीही भेट घेण्याचे नियोजन केले होते. चीन इसाला दहशतवादी मानतो. भारताच्या या निर्णयाला चीनने विरोध दर्शवला.

बीजिंगमधून विरोध
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुइंग यांनी म्हटले की, ‘ डोल्कुन दहशतवादी म्हणून घोषित आहे. इंटरपोलच्या यादीत त्याचे नाव आहे. चिनी पोलिसांनाही तो हवा आहे. तो कायद्यापुढे गुन्हेगार असताना सर्व देशांची त्याला कायद्याच्या हवाली करण्याची जबाबदारी आहे.’