आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM To Decide On Constructing 2000 Km Strategic Road In Arunachal Pradesh

चीन सीमेला लागून असलेल्या अरूणाचल प्रदेशमध्ये तयार होणार 2000 किमी लांब रस्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनच्या सीमा भागाला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये सरकारने 2000 किलोमीटर लांब रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पीएमओ कार्यालयाला पाठवला आहे. गृहमंत्रालयातर्फे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर पीएमओ कार्यालयाला अंतिम निर्णय घ्यायचा आहे.
प्रस्‍तावानुसार तवांग ते विजयनगर यादम्यान तयार होणारा हा रस्ता चीनला लागून असलेल्या संपूर्ण सीमेला कव्हर करणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचा वापर प्रत्येक ऋतूमध्ये करता येणे शक्य आहे.

50 हजार कोटींची योजना
सूत्रांच्या मते, हा रस्ता तयार झाल्यानंतर सीमेवर तयार करण्याबाबत चीनच्या मुकाबल्यात भारताची स्थिती सुधारेल अथवा चीनच्या बरोबरीने होईल. या रस्त्याच्या निर्मितीसाठी साधारण 50 हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी अंदाजे 5 वर्षाचा कालावधी लागू शकतो.

डोवालांची परवानगी गरजेची
या योजनेसाठी रक्षा, वन व पर्यावरण, परविहन मंत्रालयांशिवाय सेना आणि राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवाल यांची देखील परवानगी असणे गरजेचे आहे. पीएमओ आणि सुरक्षा संबंधीत असणारी कॅबिनेट कमीटी (सीसीएस) च्या परवानगीनंतर राष्‍ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) तर्फे या योजनासंदर्भात विस्‍तृत रिपोर्ट (डीपीआर) बनवण्यास सांगण्यात येईल.