आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Economy Doubles In Just 7 Years, World Bank Report

7 वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था दुप्पट, 130 लाख कोटी रु. चा झाला जीडीपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आता २ ट्रिलियन डॉलर म्हणजेच १३० लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनला आहे. फक्त ७ वर्षांत भारताने अर्थव्यवस्थेत १ ट्रिलियन डॉलर म्हणजे ६३ हजार ४०० अब्ज रुपयांची वाढ केली. एवढी तेजी दाखवणारा भारत चीननंतर जगातील दुसरा देश ठरला. जगात झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक देश आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
पहिलेे 1 ट्रिलियन 60 वर्षांत दुसरे फक्त 7 वर्षांत
- स्वातंत्र्यानंतर 2007-08 मध्ये जीडीपीने 1 ट्रिलियन डॉलरचा आकडा गाठला होता.
- 5 वर्षांत होणार 3 ट्रिलियन डॉलर
- 2014-15 मध्ये देशाचा विकासदर
- 7.3% होता, तर चीनचा 7.0%
एक वर्षात लोकांची सरासरी वार्षिक कमाई 3170 रुपयांपर्यंत
2013 1,560 डॉलर (98,904 रु.)
2014 1,610 डॉलर (1,02,074 रु.)
या हिशेबाने निम्न मध्यम उत्पन्न गटाच्या देशांत येतो. भारताव्यतिरिक्त टॉप-10 अर्थव्यवस्था असलेला एकही देश या गटात नाही. अापल्यापेक्षा अमेरिका 34 पटींनी पुढे आहे.
सुपर रिच वाढणार
- 2013 मध्ये भारत सुपर रिचमध्ये 13 व्या स्थानी होता. पण 2014 मध्ये अमेरिका, चीन व ब्रिटननंतर चौथे स्थान.
- 2019 पर्यंत टॉपवर पोहोचू. 5 वर्षांत विकासदर 21% होईल. चीनचा मात्र 10.3% च असेल.
(बाेस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा अहवाल)
पुढील स्लाइडवर पाहा, वृद्धीच्या वेगाबाबत भारत दुसरा...