आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकदा बलात्काराची शिकार झाली पहिली ट्रान्सजेंडर प्राचार्य, \'मोठ्या लढ्यानंतर मिळाले यश\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारतात प्रथमच एका ट्रान्सजेंडरची प्राचार्यपदी नियुक्ती होत आहे. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील वुमन्स कॉलेजमध्ये 9 जून रोजी लिंगपरिवर्तन केलेल्या मानबी बॅनर्जी प्राचार्य होणार आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की लहान असतानाच मी अनेकदा बलात्काराची शिकार झाले होते. मानबी सध्या विवेकानंदर सतोवार्षिकी महाविद्यालयात बंगाली भाषेच्या सहायक प्राध्यापक आहेत. भारतातच नाही तर कदाचित जगात प्रथमच एक ट्रान्सजेंडर प्राचार्य होत आहे.
मानबी म्हणाल्या - अनेकदा अत्याचार झाले, जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला
मानबी आधी सोमनाथ होत्या. पुढील महिन्यात त्या त्यांच्याच जन्मभूमीत प्राचार्य म्हणून जाणार आहेत. याक्षणी त्यांच्या डोळ्यात आनंद आहे, त्याचवेळी गतकाळाच्या आठवणी दाटून आल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'फार मोठी लढाई लढल्यानंतर हे यश मिळाले आहे. एक वेळ अशी होती, की ट्रान्सजेंडर आहे म्हणून अपमानीत व्हावे लागत होते. माझे बालपन नदियामध्येच गेले आहे. आता मी सन्मानाने माझ्या घरी परतत आहे. आजपर्यंत मी खूप अपमान आणि टीका सहन केली आहे. शाळेत मला मारहाण केली जायची. एवढेच नाही तर, माझ्यावर कित्येकवेळा बलात्कार देखील झाले. काही लोकांनी मी राहात होते त्या अपार्टमेंटला पेटवून देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.'
सोमनाथ ते मानबीची कहाणी
मानबी बॅनर्जीचे पूर्वीचे नाव सोमनाथ होते. घरात दोन बहिणी एकच मुलगा. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की लहान असतानाच मला मी मुलगी असल्याच्या जाणवत होते. पण माझ्या वडिलांना ते पसंत नव्हते. मला शिक्षणासोबतच नृत्याच्या वर्गाला जाणे आवडत होते. त्यावरुन माझे वडील कायम मला टोमणे मारायचे. पण माझ्या बहिणी माझ्या सोबत असायच्या. जस-जशी मी मोठी होऊ लागले मला मुलींपेक्षा मुले जास्त आवडू लागली. एखाद्या मुलाने केलेला स्पर्ष वेगळी अनुभूती असायचा. पण मी माझ्या मनातील कोणाला सांगू शकत नव्हते. मी शाळेत असतानाच एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले होते. पण माझ्यात काहीही बदल झाला नाही. डॉक्टर मला सांगत, की मी मुलगी असल्याच्या कल्पना करणे सोडून द्यावे. ते विचार मनातून काढून टाक. काही डॉक्टरांनी तर मला मी मुलगी असल्याची भावना मनातून काढली नाही तर मला आत्महत्या करावी लागेल, असेही सांगितले. ते मला झोपेच्या गोळ्यात देत होते. पण मी त्या फेकून देत असे. माझे जीवन असेच चालेल होते. मी घरात मुलीसारखी राहायचे आणि बाहेर जाताना कुटुंबीयांच्या दाबावामुळे शर्ट-पँट परिधान करावे लागत होते. होमो असल्यामुळे लोक माझ्यावर टीका-टिप्पणी करत पण त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम मी होऊ दिला नाही.
2003 मध्ये पाच लाखांत करुन घेतले ऑपरेशन आणि झाली पूर्ण महिला
मानबी सांगते, की 2003-2004 मध्ये मी मनाचा पूर्ण निश्चय केला आणि लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. तेव्हा मला त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. अनेक ऑपरेशन्स करावे लागले. त्यानंतर मी पूर्ण पणे स्वतंत्र झाले. आता मी मला जे पाहिजे ते नेसू शकते. साडीही आरामात नेसते. ऑपरेशनननंतर सोमनाथ हे नाव बदलून मानबी हे नाव धारण केले. बंगालीमध्ये मानबीचा अर्थ महिला होतो.
कादंबरी लिहिली, स्वतःचे नियतकालिकही सुरु
1995 मध्ये मानबीने लिंग परिवर्तितांसाठी ओब-मानव (उप-मानव) हे नियतकालिक सुरु केले. त्याची फार विक्री होत नाही पण त्यांनी निष्ठेने ते सुरु ठेवले आहे. मानबीने स्वतःच्या अनुभवावर आधारित एंडलेस बाँडेज (Endless Bondage) ही कादंबरी लिहिली. ती बेस्टसेलर आहे. त्या म्हणतात, आजही पुस्तकाची मागणी होत असते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मानबीची आणखी छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...