आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या रक्तात श्रीरामाचे डीएनए, राम सर्वांची प्रेरणा : राम नाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आपल्या वक्त्यव्यामुळे चर्चेत आले आहेत. भारताच्या रक्तामध्ये भगवान श्रीरामाचे डीएनए आहेत. जनतेला आपला राजा रामासारखा असावा, असे वाटते. प्रत्येकाला आपला मुलगा रामासारखा असावा, असे वाटते. प्रत्येक पत्नीला पती रामाप्रमाणे असावा, असे वाटते. राम सर्वांची प्रेरणा आहेत.

रविवारी येथील संकटमोचन धाम सैलई येथील एका कार्यक्रमात राज्यपाल नाईक बोलत होते. रामाचे जीवन हनुमानाशिवाय अपूर्ण आहे. सेवा धर्माचा भाव हनुमानाकडून शिकला पाहिजे. राज्यपाल अधिका-यांना उद्देशून म्हणाले, जनतेप्रती सेवाभाव ठेवणे हीच भक्ती आहे. आपल्या ज्या हुद्द्यावर आहोत. त्या अधिकाराचा जनतेच्या सेवेसाठी वापर केला पाहिजे. या अगोदरही राम नाईक यांनी राम मंदिरचा मुद्दा जाहीरपणे मांडला आहे. हा मुद्दा त्यांनी अयोध्येत मांडला होता. अखेर राम मंदिर कधी तयार होईल, असा सवाल भारतीयाच्या मनात आहे.