आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Hoists Tallest Tricolour At Attari, Pakistan Fears It Could Be Used For Spyin

अटारी सीमेवर लावलेल्या भारतीय राष्ट्रध्वजाद्वारे हेरगिरीची पाकला भीती, नोंदवला आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - अटारी सीमेवर देशातील सर्वांत उंच तिरंगा फडकवण्यात आला आहे. पण पाकिस्यातानने मात्र या तिरंग्याचा धसका घेतला आहे. या तिरंग्याद्वारे भारत हेरगिरी करू शकतो, अशी पाकिस्तानला भिती आहे. 360 फूट ऊंचीवरील या ध्वाचे अनावर रविवारी झाले. लाहोरमधून दिसू शकेल एवढा मोठा हा ध्वज आहे. या ध्वजाचा खांब 360 फूट उंच आहे. तर ध्वजाची लांबी 120 फूट आणि रुंदी 80 फूट एवढी आहे. त्यासाठी 3.5 कोटी रुपये खर्च आला आहे. 
 
पाक अधिकारी म्हणाले.. 
- मीडियाने दिलेल्या  माहितीनुसार - अटारी सीमेवरील हा तिरंगा पाकिस्तानला भीती वाटत आहे. 
- हा ध्वज आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात उबारला असल्याचे सांगत सीमेपासून दूरवर हा ध्वज उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
- भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, हा ध्व्ज सीमेपासून 200 मीटर अंतरावर उभारण्यात आला आहे. त्यात सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन झाले आहे, असेही लष्कराकडून सांगण्यात आले आहे. 
 
देशामधील उंच राष्ट्रध्वज    
- 237 फूट उंचीचा ध्वज कटराज तलाव पुणे येथे फडकवण्यात आला आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंचीचा हा ध्वज आहे. 
- 250 फूट - फरिदाबादमध्ये अमित शहा यांनी हा ध्वज फडकावला आहे. 
- 269 फूट - रायपूरच्या तेलीबंधा तलावाजवळ मुख्यमंत्री रमणसिंह यांनी हा ध्वज फडकावला आहे. 
291 फूट - हैद्राबादमध्ये हुसेन सागर तलावाजवळ संजीव पार्कमध्ये. 
293 फूट  - रांची 

पुढील स्लाईडवर पाहा, फोटोज आणि व्हिडीओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...