आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था; जानेवारी-मार्च तिमाहीत ७.५ टक्के विकासदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनला मागे टाकून भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत देशाचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) ७.५ टक्के नोंदले गेले. तर याच तिमाहीत चीनचा विकासदर ७ टक्के होता. मार्चच्या तिमाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष असलेल्या देशातील उत्पादन क्षेत्रात मोठी तेजी आली आहे. परंतु कृषी क्षेत्राचे उत्पादन मात्र घटले आहे. संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास २०१४-१५ मध्ये भारताचा जीडीपी ७.३ टक्के राहिला. तो मागील २०१३-१४ आर्थिक वर्षाच्या ६.९ टक्के जीडीपीपेक्षा ०.४ टक्के अधिक आहे. सरकारने फेब्रुवारीत जारी केलेल्या ७.४ टक्के पूर्वानुमानाच्या ७.४ टक्क्यांच्या अगदीच जवळ आहे.

जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ ८.४ टक्के वेगाने झाली. तर कृषी क्षेत्राचा विकासदर १.४ टक्के राहिला. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केला. तो रोजगारपूरक उत्पादन क्षेत्राला चालना देत आहे. मात्र कृषी अर्थव्यवस्था घसरणीचा सामना करत असलेल्या ग्रामीण भागात त्याला विरोध होत आहे.

देशातील आर्थिक घडामोडींच्या मूल्यांकनासाठी सरकारने ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीएस) या नवीन संकल्पनेचा अंगीकार केला आहे. ती २०१४-१५ आर्थिक वर्षात ७.२ टक्के दराने वाढत आहे. त्याआधीच्या वर्षी जीव्हीएस ६.६ टक्के होती. विशेष म्हणजे या आधीच्या वर्षांत विकासदराच्या मोजमापाचे आधार वर्ष २००४-०५ होते. आता ते बदलून २०११-१२ करण्यात आले आहे. त्यानुसार २०१३-१४ मध्ये देशाचा विकास दर ६.९ टक्क्यांवर आला होता. आधीच्या २००४-०५ या आधारवर्षानुसार २०१३-१४ चा विकास दर ४.७ टक्के होता.

ही आहेत आव्हाने :
{ औद्योगिक विकासाची मंद गती.
{ कंपन्याची कमाईही दबावात.
{ बँकांची मोठी रक्कम कर्जामध्ये अडकून पडली आहे.
{ उद्योग जगतासाठी कर्ज महाग झाले आहे.
{ कंपन्यांकडून गुंतवणुकीला म्हणावी तशी गती आलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते...
देशाच्या विकासदरात भलेही तेजी आली असेल परंतु अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी संघर्ष करत आहे. अर्थव्यवस्थेला पूर्ण गती येईपर्यंत विकासात घसरण होऊ शकते. त्यामुळे सरकारच्या दाव्यानुसार ८-८.५ टक्के विकासदर प्राप्त करता येण्याची शक्यता कमी आहे.

प्रतिव्यक्ती कमाई वाढली
विद्यमान किमतींच्या आधारे २०१४-१५ या वर्षात प्रतिव्यक्ती कमाई ७३६० रुपयांनी वाढून ८७,७४८ रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. २०१३-१४ मधील ८०,३८८ रुपयांच्या तुलनेत ती ९.२ टक्के अधिक आहे.
बातम्या आणखी आहेत...