आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आल्हाददायक देश, असहिष्णुतेवर चर्चा सुरू असतानाच विदेशी लोकांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/ लखनऊ/औरंगाबाद/अहमदाबाद/ग्वाल्हेर/पाटणा- असहिष्णुतेवर चर्चा सुरू असतानाच भारताविषयी विदेशी लोकांचे मत काय हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. दिव्य मराठी नेटवर्कने औरंगाबादसह देशातील प्रमुख पर्यटनस्थळांचे व्हिजिटर्स बुक वाचले. यात विदेशी पर्यटकांनी भारताविषयी आपल्या भावना लिहून ठेवल्या आहेत.
२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळातील हे अभिप्राय आहेत. सुमारे ६ हजार पर्यटकांचे अभिप्राय आम्ही एकत्र केले. त्यातील भारताच्या वैशिष्ट्यांविषयी लिहून ठेवलेली काही निवडक मते...
ग्वाल्हेरचा किल्ला पाहून न्यूझीलंडच्या महिलेने लिहिले- माय गॉड! भारतीय स्त्री एवढी स्ट्राँग होती की तिच्यासाठी वेगळे महाल असायचे.
आशियाई देशांतील पर्यटक
महात्मा गांधींना जाणून घेण्यासाठी मी साबरमती आश्रमात आलो होतो. भारतीयांवर गांधींचा पगडा असल्याचे समजले. लोकांच्या बोलण्या-वागण्यात प्रेम दिसते. इतर कोठे हे आढळत नाही. -कुसेनोव्ह अबेलगाजी, कझाकिस्तान

चीनच्या शांघायहून आलेले एडनीन लिहितात, भारतीय मुस्लिम संस्कृती व स्थापत्यकलेने आम्ही पूर्णपणे भारावून गेलो. बिहारच्या बोधगया येथील पुस्तिकेत कंबोडियाची सारा लिहिते की, भारताच्या भूमीवरील लोक मनमिळाऊ आहेत.

राजगीर पाहायला आलेली इंडोनेशियाची पेट्रिक म्हणते, असा देश की येथे पुन:पुन्हा यावेसे वाटते. जयपूरचा हवामहल, आमेरचा किल्ला, जलमहाल पाहणाऱ्या अझरबैजानच्या लेला अॅलियेवाच्या मते भारत अमेझिंग आहे.

अमेरिकी पर्यटक
उदयपूरला आलेले नाॅर्थ कॅरोलिनाचे इलिज बँकसिले म्हणतात, मी दोन महिने भारतात होतो. अमेरिकेपेक्षा हा देश खूप वेगळा आहे. लोक क्षणाक्षणाचा आनंद घेतात. बहुतेकांची आयुष्ये देशसेवेलाच समर्पित असतात.

जयपूरला आलेला अमेरिकी पर्यटक म्हणतो - भारतीयांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. नेहमी नवा उत्साह, आनंद घेऊन भेटतात.

११ महिन्यांत ६६ लाख पर्यटक
-गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.५% जास्त विदेशी पर्यटक देशात आले.
-सर्वाधिक विदेशी पर्यटक तामिळनाडूत येतात. येणाऱ्यांपैकी २१%. पाठोपाठ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आहेत.
-उत्तर भारतीय राज्यांत सर्वाधिक म्हणजे ३६% विदेशी पर्यटक येतात.
-विदेशी पर्यटक येण्यात भारताचा जगात ४१ वा क्रमांक आहे. अव्वल स्थानी फ्रान्स, तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा युरोपीय देशांचे पर्यटक