आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत क्षेपणास्त्र उत्पादन दुप्पट करण्याच्या तयारीत, के. जयरामन यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - भारत सध्या दर महिन्याला ५० ते ६० आकाश क्षेपणास्त्रांचे उत्पादन करतो. ते दुपटीने वाढवून दरमहा १०० एवढे करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे (डीआरडीएल) संचालक, प्रख्यात शास्त्रज्ञ के. जयरामन यांनी बुधवारी दिली.

एका कार्यक्रमात जयरामन म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) ही कंपनी सध्या दर महिन्याला ५० ते ६० आकाश क्षेपणास्त्रे तयार करत आहे. हा उत्पादन दर वाढवून तो दरमहा १०० करावा, यावर केंद्र सरकार भर देत आहे.
बातम्या आणखी आहेत...