आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरसॉनिक क्षेपणास्त्रवाहक विमानाची निर्मिती, ध्वनीच्या वेगापेक्षा २५ पट अधिक वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारतीय वैज्ञानिक अतिवेगवान विमानाच्या निर्मितीचे प्रयत्न करत आहेत. या विमानाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २५ पट अधिक असेल.या सुपरसॉनिक विमानाची गती ताशी २५ हजार किमी असेल. लांबवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांना वाहून नेण्यासाठी या विमानाची निर्मिती करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर भारत आकाशातून जगाच्या कोणत्याही कोप-यात क्षेपणास्त्र हल्ला करण्यास सक्षम होईल. डीआरडीओचे माजी प्रमुख नियंत्रक ए. शिवथनू पिल्लई यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हे विमान हेलियम-३ इंधनाने उड्डाण करू शकेल.

शुक्रवारी सब-सॉनिक ‘निर्भय’ची चाचणी
बालासोर (ओडिशा)। लांबवर मारा करणा-या स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची दुसरी चाचणी शुक्रवारी करण्यात येणार आहे. हे सब-सॉनिक (ध्वनीच्या गतीपेक्षा कमी गती असलेले) क्षेपणास्त्र आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या पहिल्या चाचणीत याची दिशा भरकटली होती. त्यामुळे याला मध्येच नष्ट करण्यात आले होते. त्यानंतर यातील उणिवा दूर केल्याचा दावा केला.