आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Myanmar Border In Seismic Shock, Divya Marathi

भारत-म्यानमार सीमेवर मध्यम भूकंपाचे धक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिलॉंग - भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी पुन्हा मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मणिपूरमधील मोरेहपासून काही किलोमीटर अंतरावर झालेल्या या भूकंपाची रिटर स्केलवर 4.8 एवढी नोंद झाली.
या भागात 24 तासांत याच तीव्रतेचा भूकंप होण्याची ही दुसरी वेळ आहे. सकाळी 8.54 ला झालेल्या या भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये होते, अशी माहिती विभागीय भूकंपमापन केंद्राच्या अधिकार्‍यांनी दिली. बुधवारच्या भूकंपातही जीवितहानी नव्हती.