आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सीमेवर लागला मेळावा, असे भेटले भारत-पाकिस्तानचे लष्करी अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- भारत आणि पाकिस्तानच्या लष्करात कायम संघर्षाचे वातावरण असते. पण सुफी संत बाबा चमलियाल यांच्या दरग्याच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात दोन्ही देशातील लष्कराच्या जवानांमध्ये अगदी खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. जम्मू आणि काश्मिरातील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये हा दरगा आहे. एरवी येथील आंतरराष्ट्रीय सिमेवर कायम गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. पण मेळाव्यात दोन्ही लष्कराच्या बॅंडचे आवाज निनादत होते. एकमेकांना मिठाई वाटली जात होती. यावेळी भेट वस्तूही देण्यात आल्या. लाखो लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते.
जून महिन्यातील अंतिम गुरुवारी हा मेळावा आयोजित केली जातो. यावेळी संत बाबा चमलियाल यांच्या दरग्यावर दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून चादर चढवली जाते. यावेळचे वातावरण अगदी बघण्यासारखे असते. दोन्ही लष्कराच्या जवानांमध्ये दिसणारा तणाव गळून पडतो. जोक्स सांगत, मिठाया वाटत आणि एकमेकांचा आदर राखत हा मेळावा साजरा केला जातो.
या अनोख्या मेळाव्याचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....