आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Pakistan Relations Over Killing Of Five Jawans

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : तणावानंतर जम्मूमध्ये कर्फ्यू, स्थानिक चॅनलचे प्रसारण बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - किश्तवाडमधील हिंसाचारामुळे जम्मू-काश्मिरमधील कायदा आणि सुव्यस्था धोक्यात आली आहे. राजौरीमध्ये लष्कराला तैनात करण्यात आले असून उधमपूरमध्ये शांती मार्च काढण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे, तर जम्मूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथे भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष यांचा विरोध वाढत आहे. ठिक-ठिकाणी पोलिस आणि संरक्षण दलासोबत त्यांची झडप होत आहे.

जम्मू दौ-यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना पोलिसांनी जम्मू विमानतळावर रोखले आहे. महेबुबा मुफ्ती यांनाही किश्तवाडमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. किश्तवाडमधील परिस्थिती बिघडलेली असल्यामुळे या नेत्यांना रोखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तर, जम्मू-काश्मीर सरकारने राज्यात सर्व स्थानिक चॅनलचे प्रसारण बंद केले आहे.

पुढील स्लाइडमध्ये संचारबंदीची छायाचित्रे