आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK चा दावा: सरताज अजीज यांना सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखले, पत्रकारांनाही भेटू दिले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट ऑफ आशिया परिषदेत इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जारिफ यांच्यासोबत उजवीकडून पाक पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज. - Divya Marathi
हार्ट ऑफ आशिया परिषदेत इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जारिफ यांच्यासोबत उजवीकडून पाक पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज.
अमृतसर - पाकिस्तान पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांना सुवर्ण मंदिरात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. रविवारी येथे झालेल्या हार्ट ऑफ आशिया परिषदेत ते सहभागी झाले होते. पाकिस्तानने दावा केला की अजीज यांना सुवर्ण मंदिरात जाण्याची इच्छा होती, मात्र त्यांना तशी परवानगी देण्यात आली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान उच्चायुक्तालयातील सूत्रांनी सांगितले की अजीज रविवारी सुवर्ण मंदिरात जाणार होते, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना परवानगी दिली नाही.
- अजीज शनिवारी सायंकाळी अमृतसरमध्ये पोहोचले होते. रविवारी ते हार्ट ऑफ आशिया परिषदेत सहभागी झाले.
- परिषदेचे स्थळ रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये अजीज यांचा मुक्काम आहे. त्यांना पाकिस्तानी मीडियालाही संबोधित करायचे होते, मात्र त्याचीही परवानगी देण्यात आली नसल्याचे पाक उच्चायुक्तांच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
अब्दूल बासित आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक चकमक
- पाकिस्तान उच्चायुक्त अब्दूल बासित आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचाही दावा सूत्रांनी केला आहे.
- सुरक्षा रक्षकांनी अजीज थांबेल आहेत त्या हॉटेलमध्ये पाकिस्तानी पत्रकारांना प्रवेश दिला नाही. यावरुन पाक उच्चायुक्त बासित आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
- त्यानंतर बासित यांनी दुसऱ्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला होता, तोही सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला.
- त्यानंतर बासित यांनी पाकिस्तानी मीडियाला संबोधित केले. रविवारी रात्री 8 वाजता सरताज अजीज पाकिस्तानला रवाना झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पंतप्रधान मोदींनी घेतले सुवर्ण मंदिरात दर्शन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...