Home »National »Other State» India Said We Fully Equipped To Face Any Challenge In Dokalam

भारत कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार; डोकलाम मुद्द्यावर सरकारची भूमिका

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 09:45 AM IST

  • भारत कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार; डोकलाम मुद्द्यावर सरकारची भूमिका
जम्मू-भारत कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले आहे. हा वाद सोडविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असल्याचेही त्यांनी सांगितले. 16 जून पासून सिक्कीममधील डोकलाम भागावरुन भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताने या भागातून आपले सैन्य हटवावे अशी मागणी केली आहे. तर भारताने दोन्ही देशांनी चर्चा करुन सैन्य मागे घ्यावे, अशी भूमिका मांडली आहे.
आपण काय करत आहोत हे अधिक महत्वपूर्ण
- जितेंद्र सिंह म्हणाले, डोकलाममध्ये आपण काय करत आहोत हे अधिक महत्वपूर्ण आहे. विरोधी पक्षाकडून याबाबत काय ट्विट करण्यात येत आहे, यावर मी बोलू इच्छित नाही. सरकारला आपल्या निर्णयावर पूर्ण भरवसा आहे. आम्ही बाहेरील आणि अंतर्गत दोन्ही परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.
भारताने वाढवली सैनिकांची संख्या
- भारताने चीन सीमेवर विशेषत: सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात 1400 किलोमीटर सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. सरकारने त्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
- भारताने आरोप लावला आहे की चीन आमच्या भागात घुसखोरी करत आहे. डोकलाम हा भारत-चीन आणि भूतानचा त्रिशंकू भाग आहे.

Next Article

Recommended