आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत पडला ब्रिटनला भारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रोचे पीएसएलव्ही-सी २८ हे अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपण यान ब्रिटनचे पाच उपग्रह घेऊन अंतराळाच्या दिशेने झेपावले आणि या क्षेत्रात भारताच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला. - Divya Marathi
इस्रोचे पीएसएलव्ही-सी २८ हे अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपण यान ब्रिटनचे पाच उपग्रह घेऊन अंतराळाच्या दिशेने झेपावले आणि या क्षेत्रात भारताच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला.
श्रीहरीकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी रात्री अंतराळ संशोधनात नवा इतिहास रचला. ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून आजपर्यंतची सर्वात अवजड अंतराळ मोहीम इस्रोने फत्ते करून दाखवली आणि एकेकाळी भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांपेक्षा अंतराळ संशोधनात आघाडीवर असल्याचे सिद्ध केले.

४४.४ मीटर उंच पीएसएलव्ही-सी २८ उपग्रह प्रक्षेपण यान आकाशात झेपावले आणि जल्लोष झाला.
९.५८ वाजता पीएसएलव्ही झेपावले आणि अवघ्या २० मिनिटांतच धुर्वीय कक्षेत त्याने उपग्रह स्थापित केले.

१४४० किलो वजनाचे ५ ब्रिटिश उपग्रह होते यानावर. भारताच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात अवजड अंतराळ मोहीम ठरली.

पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्याची दररोज छायाचित्रे टिपण्याची ब्रिटनच्या या डीएमसी मालिकेतील उपग्रहांची क्षमता आहे.
पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक आपत्तींचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी ब्रिटन या पाचही उपग्रहांचा वापर करणार आहे.

रोमहर्षक मोहीम
ही अत्यंत रोमहर्षक अंतराळ मोहीम होती. ती आम्ही अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे.
- किरण कुमार, इस्रोचे अध्यक्ष