आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाक सीमेवर २०१८ पर्यंत भक्कम तटबंदी उभारू : गृहमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैसलमेर - भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमेवर भक्कम तटबंदी उभारण्यात येईल. त्यामुळे घुसखोरीसह दहशतवादाच्या समस्येला आळा घालण्यात काही प्रमाणात यश मिळेल. सीमेवरील सुरक्षा भिंत २०१८ पर्यंत बांधण्याचा प्रस्ताव आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.

देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या मंत्र्यांसोबत शुक्रवारी राजनाथ यांनी बैठक घेतली. त्यात सीमेवरील राज्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सीमावर्ती चार राज्यांचे मंत्री उपस्थित होते. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, गुजरात, राजस्थानचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा अनुक्रमे गुलाबचंद कटारिया, जम्मू व काश्मीरचे मुख्य सचिव ब्रिज राज शर्मा बैठकीत सहभागी होते. पाकिस्तानसोबतच्या सीमेवर सुरक्षा भिंत बांधण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही भिंत डिसेंबर २०१८ पर्यंत बांधून पूर्ण होईल. सुरक्षा भिंतीबरोबरच सीमेवर अतिशय कडक स्वरूपाची निगराणी यंत्रणाही सुरू होणार आहे. त्याचे नियंत्रण केंद्र,राज्य सरकारच्या पातळीवर केले जाणार आहे. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. . ही नवीन कल्पना आहे. त्यासाठी सल्ला व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सीमा बांधण्यात येईल, असे राजनाथ म्हणाले.

बांधकामावर बीएसएफ, सुरक्षा यंत्रणेची निगराणी राहणार
डिसेंबर २०१८ पर्यंत सुरक्षा भिंतीचा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते काम व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी त्यावर बीएसएफ व सुरक्षा यंत्रणेकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे. सुरक्षा भिंतीच्या बांधकामासोबत तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. सीमेला सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...