आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Violated Ceasefire 57 Times,So Yes We Need To Resolve It Abdul Basit

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद/नवी दिल्ली- अलाहाबादमधील एका कोर्टाने काश्मीरमधील फुटीरवादी नेते शब्बीर शाह आणि पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारने आक्षेप घेतल्यानंतरही अब्दुल बासित यांनी फुटीरवाद्यांशी चर्चा केली होती. हार्यकोर्टाचे वकील सुशीलकुमार मिश्र यांनी दाखल केलेल्या याचिकेवर वरील आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आपल्या राजनैतिक अधिकारांचा गैरवापर करून फुटीरवाद्यांशी चर्चा केल्याचा आरोप याचिकाकर्ते सुशीलकुमार मिक्ष यांनी याचिकेद्वारे केला आहे. परंतु अब्दुल बासित यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करता येणार नाही, असे काही विधीतज्ज्ञांनी सांगितले आहे. उच्चायुक्तांना विशेष अधिकार प्राप्त होत असतात. त्यामुळे कोणत्याही देशाचे उच्चायुक्त‍ असोत त्यांना आंतरराष्ट्रीय कायदे बंधनकारक असतात. परिणामी अब्दुल बासित यांच्यावर जर खटला दाखल झाला तरी तो त्वरीत रद्दही केला जाईल.
काय म्हणतात एक्सपर्ट्‍स...
सुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता यांच्यानुसार, पाकिस्तानच्या उच्चायुक्तावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचा मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश मुळात चुकीचा आहे. बचाव पक्षाने याचिकेद्वारा पाकिस्तानचे उच्चायुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, उच्चायुक्तांना विशेष अधिकार प्राप्त होत असतात, याचा कोर्टाला विसर पडला असल्याचेही विराग गुप्ता यांनी म्हटले आहे. कार्टाचे आदेश पाकिस्तानी उच्चायुक्तांनासोडून अन्य भारतीय नागरिकांवरच लागू होऊ शकतात. तसेच पोलिसांनी अब्दुल बासित यांच्याविरुद्ध खटला दाखल केला तरी तो लवकरच रद्दही करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बासित यांनी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्यानंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. येत्या 25 ऑगस्टला निश्चित करण्यात परराष्ट्र सचिव स्‍तरावरील चर्चा भारताने रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा...
भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्‍तानचा खोडसाळपणा थांबलेला नाही. भारतीय सीमेवर गोळीबार करणार्‍या पाकिस्तानने बुधवारी पुन्हा एकदा उलट्या बोंबा मारल्या. भारतीय सैन्यानेही सीमेवर 57 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे.
भारतावर पलटवार करत बासित म्हणाले, शस्त्रसंधीचे उल्लंघन फक्त पाक सैन्याने केलेले नाही. भारतीय सैन्यानेही 57 वेळा पाकसीमेवर गोळीबार केला होता. काश्मीर मुद्या इतकाच सीमेवर होणार्‍या गोळीबाराच्या मुद्दा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांनी या मुद्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. दोन्ही देशांनी काश्‍मीरसह सर्व मुद्यांवर व्‍यावहारिक दृष्टीकोणातून गांभिर्याने काम करणे आवश्यक असल्याचेही बासित यांनी म्हटले आहे.

भारत सरकारच्या निर्णयावर आपण नाराज नसल्याचेही बासित यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्यावर शांततापूर्व मार्ग काढण्यासाठी काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करणेही महत्त्वाचे असल्याचे बासित यांनी सांगितले.

(फोटो: पत्रकार परिषदेत संबोधित करताना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित)